मराठवाडा

दहिवडी ग्रामपंचायत निवडणुकीत म्हसोबा ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व; कार्यकर्त्यांचा जल्लोष

Share Now

काटी -(प्रतिनिधी)
तुळजापूर तालुक्यातील 53 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि.15 रोजी झालेल्या निवडणूकीत दहिवडी ग्रामपंचायतीचा समावेश होता. या निवडणुकीत म्हसोबा ग्रामविकास पॅनलने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले असून या निवडणुकीत 9 सदस्य संख्येपैकी     म्हसोबा ग्रामविकास पॅनलचे चार सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून पाच जागेसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत म्हसोबा ग्रामविकास पॅनलचे तीन सदस्य निवडून आले आहेत. या निवडणुकीत म्हसोबा ग्रामविकास पॅनलचे वार्ड क्रमांक एक मधून  सुजाता शिवाजी अंधारे, संतोषी तानाजी गायकवाड, वार्ड क्रमांक दोन मधून रुपाली प्रशांत गाटे, अण्णासाहेब बाबु गाटे, संजय बबन आदलिंगे, तर वार्ड क्रमांक तीन मधून कल्पना प्रकाश अंबुरे, व साधना भागवत मंडलिक हे विजयी झाले आहेत. विरोधी कुलस्वामिनी पॅनलचे वार्ड क्रमांक मधून सचिन शिवाजी गाटे व वार्ड क्रमांक एक मधुन विठ्ठल भाऊ गायकवाड हे विजयी झाले. विरोधी कुलस्वामिनी पॅनलला   फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले. म्हसोबा ग्रामविकास पॅनलच्या  सर्व कार्यर्कत्यांनी गुलालाची मुक्त उधळण व फटाक्यांची आतषबाजी करित आनंदोत्सव साजरा केला.

from माझी बातमी https://ift.tt/3ipYi8V
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!