मराठवाडा

आनंद कंदले यांना आरोग्य मंत्री श्री राजेशजी टोपे यांच्या हस्ते आरोग्य मित्र कोरोना योध्दा पुरस्कार

Share Now

तुळजापूर (प्रतिनिधी) –
         तुळजापुर शहरातील डॉ श्री अभय घोलकर यांच्या आशिर्वाद हाँस्पीटल उदघाटन समारोह प्रसंगी राज्याचे आरोग्य मंत्री श्री राजेशजी टोपे आले असता कोरोना काळातील अन्नदान, लाँक डाऊन काळात रिक्षाने मोफत रुग्ण सेवा, मास्क वाटप, सँनिटायझर वाटप, क्वारंटाईन नागरीक सेवा, लाँक डाऊन काळात गपचुप विना तपासणी कोणी शहरात येऊ नये म्हणून रात्री 11 ते 4 सलग 25 दिवस गस्त सेवा, असे अनेक जनसेवेचे उपक्रम कोरोना काळात जिवाची पर्वा न करता राबवून नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला या मुळे आनंद कंदले यांना आरोग्य मंत्री श्री राजेशजी टोपे साहेब यांच्या हस्ते आरोग्य मित्र कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, 
या वेळी महंत वाकोजी बुवा, महंत मावजीनाथ बाबा, महंत हमरोजी बाबा तसेच खासदार ओमराजे निंबाळकर, राज्यमंत्री संजयजी बनसोडे, मा.आमदार मधुकररावजी चव्हाण, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मा जिप अध्यक्ष धीरज पाटील व मान्यवर उपस्थित होते.

from माझी बातमी https://ift.tt/2LzqU3N
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!