मराठवाडा

मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी प्रा.डॉ.शिवपुत्र कनाडे तर उपाध्यक्षपदी प्रा.डॉ.सुभाष हुलपल्ले यांची निवड

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी 
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलास कोळेकर यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या २०२०-२१ च्या कार्यकारिणीची निवड नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम येथील इंग्रजी विभागातील प्रा.डॉ. शिवपुत्र कनाडे यांची मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी तर भूगोल विभागातील प्रा.डॉ.सुभाष हुलपल्ले यांची उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. या निवडीचे वृत्त कळताच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांनी दोघांचाही महाविद्यालयात यथोचित सत्कार केला. याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, जिल्हा सचिव प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, प्रा.डॉ.सतीश शेळके, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.रवींद्र आळंगे, प्रा.भूषण पाताळे, प्रा.गोपाळ कुलकर्णी, प्रा.दयानंद बिराजदार, महादेव पाटील, मनोज हावळे, योगेश पांचाळ, पृथ्वीराज गव्हाणे आदिंची उपस्थिती होती. या यशाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूमचे अध्यक्ष बापुराव पाटील, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. नरसिंग कदम, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, प्रा.सुजित मठकरी, डॉ.सुशील मठपती, डॉ.अविनाश मुळे महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.

from माझी बातमी https://ift.tt/3o9MwAV
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!