मराठवाडा

भोसगा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बळीराजा ग्रामविकास पॅनल च्या सौ‌.गोसावी तर उपसरपंच पदी पाटील

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील भोसगा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बळीराजा ग्रामविकास पॅनल च्या सौ.शशिकला गोसावी तर उपसरपंचपदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दि.8 फेब्रुवारी 2021 रोजी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून संगमकर उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक संजय कारभारी, पोलीस पाटील ज्योती हतरगे, तंटामुक्तअध्यक्ष चंद्रकांत मनाळे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व्यंकट कागे, सुभाष बिराजदार, सौ.शेषाबाई एकुंडे, सौ.संगीता पारदे, सौ.सुलताना शहा, सौ.उषा आडे, मिलिंद सोनकांबळे उपस्थित होते. सरपंच पदासाठी सौ. शशिकला गोसावी व उपसरपंच पदासाठी संजय पाटील यांचेच अर्ज दाखल असल्याने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हि निवड जाहीर होताच नुतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. व कार्यकर्त्यांनी फटाके फोडुन, गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. यावेळी प्रतिष्ठित नागरिक माणिक बिराजदार, भरत नायकोडे, बालाजी एकुंडे, जिलानी शाहा, प्रसन्न एकुंडे, राजेंद्र मनाळे, शिवशंकर हत्तरगे, सिद्धू बिराजदार, दादासाहेब वडगावे, खंडू थाटे, यल्लालींग एकुंडे, काशिनाथ मानाळे, रेवणसिद्ध काटगावे, यांच्यास युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

from माझी बातमी https://ift.tt/2LAV5rh
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!