Share Now
कळंब (प्रतिनिधी) –
मौजे हसेगाव केज तालुका कळंब येथे दिनांक 9 फेब्रुवारी 2021 रोजी पर्याय संस्था, महिंद्रा होम फायनान्स, हॅबिटॅट फोर ह्युमॅनिटी इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमानाने 250 वैयक्तिक शौचालय बांधकाम कार्यक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले.
कळंब तालुक्यातील विधवा परित्यक्ता, निराधार, दुर्लक्षित कुटुंबातील 150 व्यक्तींना मोफत शौचालय बांधून देण्यात येणार आहेत, तसेच 100 शौचालय लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात बांधण्यात येणार आहेत. शौचालय बांधकामाची सुरुवात मौजे हसेगाव केज येथील अपरुगाबाई लिंगाप्पा साळवे यांच्या शौचालय बांधकामाचे भूमिपूजन करून करण्यात आली. आणि पर्याय संस्थेच्या कॅम्पस वरती कळंब तालुक्यातील 75 लाभार्थी महिलांना शौचालय बांधकाम करीत असताना घ्यावयाची काळजी, शौचालय बांधकामाचे महत्व आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम , व बांधकाम झाल्यानंतर त्याचा योग्य वापर याविषयी माहिती प्रशिक्षण कार्यक्रम देण्यात आली .
भूमिपूजन कार्यक्रमाच्या साठी गावचे सरपंच विशंभर आप्पा पाटील, ग्रा. प. सदस्य,
*प्रमुख पाहुणे*
श्री. बबन बोबडे रिजनल बिझनेस हेड, श्री. जॉन मॅथ्यू डायरेक्टर, हॅबिटॅट फोर हुमानिटी इंडिया, श्री.प्रबोध नायक, श्री. रमजान शेख मॅनेजर महिंद्रा होम फायनान्स, श्री. प्रथमेश जठार , श्री. उत्तम पंधारे सह त्यांची पूर्ण टीम सहभागी होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्याय संस्थेचे विलास गोडगे , आश्रुबा गायकवाड, सुनील कांबळे,अशोक गायकवाड, अशोक तोडकर , सुनंदा खराटे , भिकाजी जाधव , बालाजी शेंडगे विकास कुदळे, पूजा पाटील, स्वाती कवडे, नीता भोरे स्वामी दादा यांनी परिश्रम घेतले.
from माझी बातमी https://ift.tt/3peZ0Ym
via IFTTT
Share Now
Add Comment