Share Now
इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
पत्रकारांना वैचारिक संवाद साधता यावा, विचारांची देवाण – घेवाण व्हावी, एकत्रित बसण्याची सोय व्हावी, यासाठी उमरगा तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी सहकार्य करू, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी यांनी केले. महाराष्ट्र पत्रकार संघ, जिल्हा उस्मानाबादच्या यांच्या वतीने उमरगा तालुक्यातील दाळींब येथे दि.14 फेब्रुवारी 2021 रोजी पत्रकार स्नेह मेळावा उमरगा तालुक्यातील दाळींब येथे घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे होते. प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी, विभागीय अध्यक्ष प्रा.डॉ.शिवपुत्र कानडे, दाळींबचे सरपंच सोमनाथ कुंभार, उपसरपंच इरफान शेख, विधिज्ञ अँड.अरुण हेडे, ज्येष्ठ सल्लागार सुमित कोथिंबीरे, आदी, उपस्थित होते. यावेळी ग्रामीण पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या इरफानअली शेख व असीफ शेलार या दोघांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाची जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करून त्यांना ओळखपत्र व दोन लाख रुपये अपघाती विम्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने नूतन पॅनलप्रमुख, सरपंच, उपसरपंच यांचा तर ग्रामपंचायतच्या वतीने नूतन जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.शिवपुत्र कनाडे, गुंडू दूधभाते, प्रा.युसुफ मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना बाबा जाफरी म्हणाले की, सोशेल मीडीयाच्या वाढत्या प्रभावामुळे दिवसेंदिवस पत्रकारिता क्षेत्रात नवनवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. यासाठी पत्रकारांना अधिक सतर्क राहून पत्रकारिता करावी लागणार आहे. या क्षेत्रात वेळीअवेळी पत्रकारांना जीवाची पर्वा न करता काम करावे लागते. तेव्हा त्यांनी स्वतः सोबत कुटूंबाची काळजी घेणेही गरजेचे असल्याचे ते शेवटी म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.महेश मोटे म्हणाले की, पत्रकारांच्या हितासाठी संघटना आवश्यक असून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम संघटना करते. आज पत्रकारांचे विविध प्रश्न असून ते सोडविण्याचे काम केवळ संघटनाच करू शकतात, असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील व सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुभाष हुलपल्ले यांनी केले तर आभार नूतन तालुकाध्यक्ष मेहबूब पठाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.परमेश्वर सूर्यवंशी, प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, प्रा.इब्राहिम इनामदार, अमोल गायकवाड, रामलिंग पुराणे, विठ्ठल चिकुंद्रे, उमेश सुरवसे, दिनेश पाटील, लक्ष्मण कांबळे, बालाजी व्हनाजे, दिगंबर पांचाळ, सुभाष गायकवाड, बालाजी बिदे, प्रा.भूषण पाताळे, किशोर औरादे, असलम शेडमवाले, नंदकुमार जाधव, दत्तात्रय नांगरे, रामेश्वर सुर्यवंशी, तानाजी घोडके, वजीरपाशा शेख, नसरोद्दीन फकिर, योगेश पांचाळ, मनोज हावळे, किशोर कारभारी, वैभव शिंदे, तात्याराव शिंदे, भीमाशंकर पांचाळ आदींनी परिश्रम घेतले.
from माझी बातमी https://ift.tt/3qp3ME2
via IFTTT
Share Now
Add Comment