मराठवाडा

लोहारा नगरपंचायत निवडणूक स्वबळावर ताकदीने लढविणार – भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
 लोहारा नागरपंचायत निवडणूक स्वबळावर ताकतीने लढविणार असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी केले. लोहारा नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भारतमाता मंदिर येथे 18 फेब्रुवारी 2021 रोजी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठीकीस प्रमुख म्हणून भाजप मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, आदि, उपस्थित होते.  या बैठीकीमध्ये शहरातील बूथ रचना बळकटीकरण शक्ती केंद्र प्रमुख व तालुका व शहर कार्यकारिणी या विषयावर मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पं.स. सदस्य वामन डावरे, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, नगरसेवक आयूब शेख, तालुका बूथ प्रमुख शिवशंकर हातर्गे, प्रशांत लांडगे, ओबीसी तालुका अध्यक्ष दगडू तिगाडे, मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, प्रशांत काळे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, शंकर मुळे, दादा मुल्ला, जयेश सुर्यवंशी, मंगेश महाजन, राजशेखर माणिकशेट्टी, मल्लीनाथ फावडे, कल्याण ढगे, प्रतीक गिरी, शिवा नारायणकर, दयानंद फरिदाबादकर, विजय महानूर, पिंटू जट्टे, पिंटू कमलापुरे, काशिनाथ घोडके, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

from माझी बातमी https://ift.tt/3bdxWUu
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!