मराठवाडा

उस्मानाबादेत शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी 
 विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्व. मारुतीराव बळीराम कोकाटे बहुउद्देशीय सेवभावी संस्था उस्मानाबाद यांच्या वतीने मंगळवारी दि, 17 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 25 जणांनी रक्तदान केले. उस्मानाबाद शहरातील इंगळे गल्ली येथील कोकाटे कॉम्प्लेक्स येथे  हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक प्रकाशराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे  जिल्हाध्यक्ष चंद्रसेन देशमुख, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी, उस्मानाबाद पालिकेचे उपाध्यक्ष अभय इंगळे, भीमाआण्णा जाधव, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अग्निवेश शिंदे, उमेशराजे निंबाळकर, पंकज पाटील, मिनील काकडे, ऍड योगेश सोने पाटील, डॉ. अश्विनी गोरे, आदि, उपस्थित होते. या शिबिरात 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्व.मारुतीराव बरीराम कोकाटे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक भारत कोकाटे, प्रवीण कोकाटे, संतोष कोकाटे, सुमित बागल, अमरसिंह गोरे, राम कोकाटे, छोटूल कोकाटे, अभिजीत कोकाटे, सुरेश शेरकर, महादेव इटलकर, राज निकम, प्रशांत झालटे व मित्रपरिवाराने परिश्रम घेतले. आरोग्य विभागाच्या वतीने गणेश साळुंखे, महादेव कावळे व इतर कर्मचारी वृंदाणी रक्तसंकलणाचे काम पाहिले. रक्तदात्यांना संयोजकाच्या वतीने केळी, अंडी, चहा बिस्कीट या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

from माझी बातमी https://ift.tt/3bhrtrI
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!