मराठवाडा

दिव्यांग व्यक्तींना लागणारे विविध साहित्य वाटप

Share Now

तुळजापूर – प्रतिनिधी
 रावसाहेब जगताप कर्णबधिर विद्यालय येथे दिनांक 22 सोमवार रोजी तालुक्यातील दिव्यांग लाभार्थींसाठी श्रवण यंत्र तीन चाकी सायकल व्हीलचेअर अंधांसाठी बेल कोबडी इत्यादी साहित्यांचे वाटप सिस्टीम ऑपरेशन कार्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया द्वारे आयोजक भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम मुंबई व समाज कल्याण विभाग यांच्या मार्फत मोफत साहित्य वाटप करण्यात आली यावेळी आलम इको मुंबई येथील श्री कमलेश यादव श्री श्याम ललित श्री गौरिष,  समाज कल्याणचे दिव्यांग विभाग प्रमुख भारत कांबळे, पञकार सचिन ताकमोघे , राहुल कोळी, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव चोपदार मुख्याध्यापक श्री मनोज गिड्डे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये तालुक्यातून आलेल्या  लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.जे. शेळके यांनी केले. यावेळी विद्यालयाचे  श्री पि.यू.कोटमळे, आर. एम. कावळे, एम.एस.बेडके, श्री मुळे श्री स्वामी श्री पठाण
 सौ. यमगर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले या कार्यक्रमासाठी दिव्यांग विद्यार्थी व लाभार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

from माझी बातमी https://ift.tt/3pK1RZw
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!