मराठवाडा

उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस संघटकपदी शेरखाने तर जनरल सेक्रेटरी पदी घोगरे

Share Now

कळंब (धनंजय घोगरे)
आखिल भारतिय काँग्रेस (आय ) च्या जिल्हा मुख्य संघटकपदी राजेंद्र शेरखाने व जिल्हा जनरल सेक्रेटरी पदी संजय घोगरे यांची नुकतीच जिल्हा अध्यक्ष धिरज पाटील यांनि नियुक्ती केली आहे .
अधिक वृत्त असे कि उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी धिरज पाटील यांची बऱ्याच दिवसापूर्वी जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाली होती . मात्र जिल्हा कार्यकारणीची निवड मात्र लांबणीवर पडलि होती .परंतू नुकतीच काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी नानासाहेब पटोले यांची निवड झाली असून पटोले यांच्या आदेशानुसार व परवानगीने जिल्हा अध्यक्ष धिरज पाटील यांनि जिल्हा कार्यकारणिच्या नियुक्त्या केल्या आहेत . त्यात उस्मानाबाद जिल्हा कॉंग्रेसच्या मुख्य संघटक पदी काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र शेरखाने यांचि नियुक्ती केली असून . कळंब येथील कॉंग्रेसचे साक्रिय कार्यकर्ते म्हणून व काँग्रेस पक्ष वाढीसाठी महत्वाचे योगदान देत असलेले संजय घोगरे यांची जिल्हा कॉंग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती केली आहे . त्याचबरोबर बापू शेळके यांची जिल्हा कोषाअध्यक्षपदी नियुक्ती केली आहे तर जिल्हा उपा अध्यक्षपदी शंकर नाना  करंजकर यांची नियुक्ती केली असून त्याचबरोबर अन्य काहि जनांच्याही नियुक्त्या केल्या आहेत ..त्यामुळे वरिल सर्वांच्या निवडीचे कॉंग्रेस कार्यकर्त्यातून स्वागत केले जात आहे.

from माझी बातमी https://ift.tt/3rf7kcJ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!