मराठवाडा

होय…मी सकारात्मक.. B For Bhikaji..B+ Be Positive & Be Happy 😃🙏

Share Now

संपादकीय…. विशेष 
तुमच्याकडे असलेला सकारात्मक विचारच तुम्हाला तारू शकतो.. याचा प्रत्यय मला आला आणि गेली महिनाभर मी ते अनुभवतोय..! 
गत वर्षी मार्च महिन्यात कोरोना नावाच्या राक्षसाने आपल्या देशासह.. राज्यात प्रवेश केला आणि सारेच ठप्प झाले..21 मार्च 2020 रोजी देश्याच्या पंतप्रधानानी लॉकडाऊन घोषित केले…गेली वर्षभर खूप काळजी घेतली, मास्क, सॅनिटाइझर.. दो गज की दुरी.. सर्व कांही पाळलं मात्र अखेर 22/03/2021 रोजी कोरोनाने मला ऐन खिंडीत गाठले… मी बाजीप्रभू सारखा लढलो.. सकारात्मक विचार डोक्यात ठेवले अन 16 दिवस कोरोना नावाच्या विषाणूशी दोन हात करून जिंकलो… कांहीही लक्षण नव्हती.. ना खोकला… ना सर्दी.. ना ताप … ना चव गेली.. ना मळमळ.. ना डोके दुःखी.. पण थोडस अंग मोडून आलं होतं…मला वाटलं रोजच्या कामाच्यामुळे थोडं थकलो असेन.. म्हणून कळंब मध्ये एका खाजगी डॉक्टरांकडे गेलो… कांहीही लक्षण नसल्याने काय कळलं नाही उपचार घेतले आणि दोन दिवस आराम करायच म्हणून दोन दिवस सुट्टी घेतली… मी गेली 18 वर्ष झाली पर्याय सामाजिक संस्थेत कार्यकर्ता म्हणून विविध पदावर काम करतोय… विविध जबाबदाऱ्या पार पाडतोय…. मग मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न असो…मुला मुलींचा अभिरुची वर्ग घेणे असो… जनावरासाठी चारा वाटप असो.. 2014 च्या दुष्काळात वाशी तालुक्यातील सहा गावात केलेले पाणी वाटप असो की विधवा परित्यक्ता.. एकल महिलांसाठी मोफत घर बांधून देण्याचा कार्यक्रम असो… सर्व महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करणे असो आदी कार्यक्रमात संस्थेचे कार्यवाहक आदरणीय विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या आणि सर्व पर्याय परिवाराच्या मार्गदर्शनाखाली काम केले आणि मी कार्यकर्ता म्हणून जॉईन झालो तेंव्हा पासून माझ्या आई वडिलांची भूमिका निभावणारे माझे प्रेरणास्थान.. आदरणीय विश्वनाथ (अण्णा) तोडकर आणि त्त्यांचा पूर्ण कौटुंबिक आणि संस्थेचा परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले… कदाचित याचेच पुण्य माझ्या पदरी पडले असेल त्यामुळेच मी सहिसलामत आलो…!
   दोन दिवस सुट्टी घेऊन घरीच बसलो होतो..थोडासा अशक्तपणा जानवू लागल्याने हसेगाव (के) येथे गावातीलच आमचे मार्गदर्शक डॉक्टर साहेब.. डॉ. प्रशांत पांचाळ सर यांच्याकडे 22 मार्चला सकाळी गेलो..गाडीही चालवत येईना म्हणून आमचा शेजारी मोनू भैय्या याला घेऊन गेलो…पांचाळ सर यांनी माझी ऑक्सिजन लेवल चेक केली..92 ऑक्सिजन लेवल आहे असं सांगुन तूम्ही सरकारी दवाखान्यात कोविड टेस्ट करून घ्या असा सल्ला दिला.. आणि मी घाबरलो 100% आता आपण पॉसिटीव्ह येणार असं मनात आलं… घरी आलो.. घरी याची कल्पना दिला… काय करावे कळेना.. अखेर माझे मित्र पत्रकार उन्मेष (दादा) पाटील यांना फोन करून हकीकत सांगितली दादांनी टेस्ट करून घ्यायला सांगितलं.. पण मला गाडी चालवता येत नव्हती… एक दोघांना फोन केला पण ते आपापल्या कामात व्यस्त होते… परत एकदा उन्मेष दादांना फोन केला त्यांनी ताबडतोब आमचे मित्र स्फूर्ती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गिड्डे पाटील यांना सांगितले.. त्यांनी आणि उन्मेष दादांचे धाकटे बंधू मकरंद पाटील सर हे ताबडतोब हसेगाव येथे माझ्या घरी आले..त्यांनी एक टमटम बोलावलं त्यामध्ये बसून मी कळंबला सरकारी दवाखान्यात दाखल झालो… अशक्तपणा होता.. थोडासा खोकला ही यायला… गिड्डे साहेब यांनी माझा आधार नंबर सांगुन चिट्ठी (केसपेपर) घेतली.. एका महिला डॉक्टरनी पाठीला स्टेथास्कोप लावून तपासणी केली.. परत जिथे ऑक्सिजन मोजायची मशीन आहे त्या बेडला गेलो तिथे बोटाला चिमटा लावला.. तशी मशीन ची टिक टिक सुरु झाली… मी अजिबात घाबरलो नाही.. स्वॅब घेण्यासाठी नाकात कापूस लावलेली काडी तेथील डॉक्टरांनी घातली.. पण तरीही मी घाबरलो नाही… कारण जून महिण्यात गिड्डे साहेब, पत्रकार बाळापुरे काका आणि मी कोरोनाची रॅपिड टेस्ट करून घेतलेली होती त्यावेळेस आम्ही तिघे निगेटिव्ह आलो होतो… आता 22 तारखेला माझा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला.. मी ओळखलं पण मला त्यांनी मी घाबरेल म्हणून सांगितलं नाही.. नातेवाईकास बोलवा म्हणून डॉक्टरांनी निरोप दिला तसा मी माझ्या पत्नीला फोन करून बोलावून घेतले… दरम्यान बाळापुरे काकाही तिथे आले… गिड्डे साहेबांनी माझी समजूत काढली की उस्मानाबाद ला सिव्हिल मध्ये एक तपासणी करायची आहे… मला तेथील नर्सनी विचारले तुमच्याकडे वाहन आहे का ऍम्ब्युलन्स मध्ये जाणार तेंव्हा मी म्हणलं ऍम्ब्युलन्स मध्ये जातो.. माझी पत्नी आली… माझा सहकारी कार्यकर्ता आणि मित्र कै. अशोक गायकवाड ही तेथे आला त्याला माझे कपडे आणायला सांगितले तो कपडे घेऊन येईपर्यंत ऍम्ब्युलन्स आली आणि कपडे न घेताच ऍम्ब्युलन्स मध्ये एकटाच बसलो.. पत्नीला घरला जायला सांगितले.. कारण घरी लेकरं होती.. ती रडतच ऍम्ब्युलन्स कडे बघत राहिली आणि ऍम्ब्युलन्स उस्मानाबाद च्या दिशेने निघाली…गर्दी असल्यामुळे ऍम्ब्युलन्स वाले ड्राइव्हर भाऊंनी सायरन वाजवायला सुरु केले.. मी अजिबात घाबरलो नाही.. चांगला ऐटीत बसलो.. खिडकी उघडून… पत्रकार सतीश टोणगे यांचा फोन आला त्यांनीही धीर दिला.. उस्मानाबाद सिव्हिल मध्ये दुपारी दोनच्या सुमारास गाडी आली… ड्रायव्हर भाऊंनी खाडकन दार उघडले आणि मी खाली उतरलो..कळंब वरून आणलेला रेफर चा केस पेपर खिशातच होता… जसा मी खाली उतरलो तसे तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बु. येथून आलेले माझे दोन मेव्हणे वाघासारखे धावत माझ्या दिशेने आले.. ते माझी वाट पाहतंच थांबले होते… सिव्हिल च्या आवारात असलेल्या तीन मजली कोविड स्पेशल इमारतीच्या पायऱ्या चढून आत गेलो.. तिथे रजिस्टर घेऊन बसलेल्या व्यक्ती पुढे केसपेपर धरला आणि म्हणलं कळंब वरून रेफर केलंय पेशंट.. तो म्हणाला पेशंट कुठंय.. मी म्हणलं मी स्वतः पण पेशंट आहे बाबा…तेंव्हा त्यांनी पहिल्या मजल्यावर जाण्यास सांगितले.. मी आणि माझा थोरला मेव्हणा सचिन देसाई दोघे वरती पहिल्या मजल्यावर गेलो.. धाकटा मेव्हण्यास गावी परत जायला सांगितलं… वरती परत तिथे लाईनला थांबून नांव… गांव… वय.. सांगितलं.. आणि बेड मिळाला.. नाकाला ऑक्सिजन ची नळी लावली… संध्याकाळी परत आणखी वरी दुसऱ्या मजल्यावर शिफ्ट केले.. म्हणजे मी स्वतः चालत गेलो.. दम भरला.. तिथे सहा नंबर चा बेड मिळाला.. तिथे ऑक्सिजन मास्क लावला आणि आडवा झोपून राहिलो.. सलाईन लावलेलं आऊट गेलं हात सुजला… परत दुसरीकडे सुई लावून सलाईन लावलं… हाताची नस काय लवकर सापडत नव्हती.. पाच वेळेस रक्तदान केलं.. तेंव्हा ही लवकर नस सापडली नव्हती.. तीन दिवस झाले.. डॉक्टरांनी विचारलं काय त्रास होतोय.. टॉयलेटला जाऊन येईपर्यंत म्हणजे पन्नास पावलं चाललं तरी दम भरतोय… पंचेवीस मार्चला सकाळी HR सिटी स्कॅन करायला तळमजल्यावर जायचे होते.. खूप अशक्तपणा जाणवू लागला.. व्हील चेअर वर एका पोराने ढकलत खाली नेहले सिटीस्क्यान करून परत ढकलत त्याने आणताना पहिल्याच मजल्यावर त्याला दम लागला मी म्हणलं थोडा दम खा आणि मग ढकल बाबा… म्हणजे स्वतःचा जीव चालला तरी लोकांविषयीची सामाजिक तळमळ कायम होती… HR सिटी चा स्कोर 25 पैकी 17 आला होता… डॉक्टरांनी ताबडतोब मला icu मध्ये घ्यायच्या सुचना दिल्या होत्या… चार नंबरच्या icu बेडला स्वतः होऊन चालत गेलो.. अतिगंभीर रुग्ण तिथे होते…पण मी खंबीरी बांधली आणि घाबरलो नाही.. सात दिवस icu बेडला होतो… या सात दिवसात अनेक घटना मी माझ्या डोळ्यांनी पहिल्या पण घाबरलो नाही… सोबत मोबाईल होताच…20-22 वर्ष वयाच्या सिस्टर… कांही तरुण डॉक्टर मुली रुग्णाच्या सेवेत होत्या… सफाई कामगार महिला आणि तरुण पोरं होती.. यांना वाटत नसेल का याची भीती असा मनात विचार आला…मी या सर्व डॉक्टर तेथील सिव्हील सर्जन… कांही शिकाऊ डॉक्टर… सिस्टर.. ब्रदर.. लॅब चे कर्मचारी… यांचा अत्यंत ऋणी आहे…. कारण यांच्यामुळंच माझे प्राण वाचले.. मला फोन करून मेसेज करून आधार देणारे पत्रकार शीतलकुमार घोंगडे, पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे, परमेश्वर पालकर सर, पत्रकार Sambhaji Gidde सर,पत्रकार विलास मुळीक सर, डॉ. प्रशांत पांचाळ सर, पत्रकार प्राचार्य सतिश मातणे सर यांचे आभार…माझे मार्गदर्शक वडील बंधू, पत्रकार बालाजी बप्पा आडसूळ यांनी तेथील डॉक्टरांशी माझ्या मेव्हण्याला कॉन्फरन्स मध्ये घेऊन फोन करून सांगितलं आणि दररोज मला मेसेज करुन आधार दिला..शिवाजीराव गिड्डे साहेब, जयश्री गिड्डे वहिनी .. मकरंद पाटील सर.. उन्मेष पाटील दादा, पत्रकार पार्श्वनाथ बाळापुरे काका, ..यांनी केलेली प्रत्यक्ष मदत मी कधीही विसरू शकत नाही..कळंबचा सर्व शासकीय रुग्णालयातील स्टाफ…या काळात 100 च्या आसपास फोन आले पण मी फोन उचलू शकलो नाही ते सर्व हितचिंतक…उस्मानाबाद चे माझे मार्गदर्शक वडील बंधू महेश पोतदार सर यांनी सतत मेसेज आणि फोन करून दिलेला आधार मी या जन्मी तरी विसरू शकत नाही.. माझा मेव्हणा सचिन… नितीन.. बहीण पूजा यांनी माझ्यासाठी 16 दिवस खुप कष्ट घेतले… दररोज जेवणं.. नाश्ता मला सचिनने पोहचवला.. कांहीही झालं तरी फोन केला सरकन दोन मजले चढून तो यायचा.. माझ्या साठी 16 दिवस रुग्णलयच्या आवारात त्याची चारचाकी गाडी लावून झोपला… चार चार मास्क लावून त्याच्या कानाला अक्षरशः जखमा झाल्या.. त्याचे उपकार मी विसरू शकत नाही… सिव्हिल मधून आयुर्वेदिक कॉलेजला रेफर केल्यानंतर तेथील स्टाफच्या अंतर्गत समनवयाचा ताळमेळ नव्हता… पत्रकार जयराम शिंदे यांनी ऍम्ब्युलन्स मध्ये तिथे जाण्याची माझी सोय केली.. पण रेफर केलेल्या केसपेपर वर सिव्हिल शिक्का नसल्याने पाऊण तास गेटवर बसून राहिलो.. मला दम लागत होता.. मीही कच्या गुरुचा चेला नाही…पट्टीचा कार्यकर्ता होतो आणि आहे.. त्यामुळे मांडी घालून पाऊण तास बसलो.. आणि बेड मिळवला.. दरम्यान महेश पोतदार सरांनी संबंधित तहसीलदार यांना फोन करून मला कॉन्फरन्स मध्ये घेतले… नोडल अधिकाऱ्यांना सांगितले…चार दिवस तिथे थांबून अखेर सहा एप्रिलला सोळाव्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला… याच काळात मला मेसेज करून आधार देणारे पत्रकार चंद्रसेन देशमुख सर यांचेही विशेष आभार… माझे सर्वस्व असलेले आदरणीय विश्वनाथ अण्णा तोडकर यांचा आजतगायत एकही दिवस असा गेला नाही की त्यांचा मेसेज आला नाही… माझ्या खात्यावर पैसे नाहीत कांही औषध आणि गोळ्या घायच्या आहेत असा मेसेज करताच अवघ्या कांही सेकंदात पैसे ट्रान्सफर केले.मला आधार देणारे माझे नातेवाईक, मित्र, माझी आई, माझ्या बहिणी…माझ्या सासूबाई,..माझे भाच्चे…माझ्या पुणे येथील मेव्हण्या.. सासू सासरे..माझी दोन मूल पत्नी या सर्वांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही… माझे हसेगाव के. येथील शेजारी झिरमिरे, खरडकर आणि सर्व परिवार.. अविनाश खरडकर सर…माझा पर्याय आणि अनिक परिवारातील सर्व स्टाफ..सर्व क्लस्टर असिस्टंट ताई, आमचे चेअरमन सुभाष तगारे काका, यशवंत आहेर सर, विलास गोडगे बापू… तेजश्री ताई, आदरणीय अनिता वहिनी, भाऊ, बाई… शेंडगे साहेब..भूम परंडा चे BM अतुल चिलवंत सर, उषाताई, जोशी सर, सर्व ca.. Fx..सुनंदा अक्का..विकास सर, असेफ सर… आश्रुबा भाऊ, अशोक आबा, सुनिल कांबळे बापू, ताटे मामा,अक्षय गुंठाळ, उमेश टोणपे सर, राजकुमार तोगरे साहेब… कै. अशोक भाऊ… सर्व ज्ञात अज्ञात यांना मी कदापि विसरू शकत नाही..आजही मी घरीच आहे.. उद्या बरोबर एक महिना होईल… आणि विशेष उद्या 20 एप्रिल रोजी वयाची चाळीशी पूर्ण होते आहे… उद्या एकेचाळीसाव्या वर्षात पदार्पण होईल… हा माझा पुनर्जन्मच असेल….. दरम्यानच्या काळात या जगाचा निरोप घेऊन परमेश्वराकडे गेलेले ICU वॉर्ड मधील माझ्या शेजारील कांही अज्ञात रुग्ण, माझे मित्र दैनिक जनप्रवास मध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं ते पत्रकार कै.हरीशचन्द्र धावारे साहेब, तुळजापूर चे डॉक्टर मार्गदर्शक मित्र प्रविण अण्णा रोचकरी सर, आमच्या देवसिंगा तुळ गांवचे तानाजी आप्पा जाधव यांच्या मातोश्री आईसाहेब, तीर्थ बु. येथील माझा मित्र अंगद यशवंत मोरे, हसेगाव येथील अशोक उर्फ पिंटू भाऊ तोडकर माळी यांच्या मातोश्री काकू आणि माझा सहकारी, गेली अनेक वर्ष एकत्र काम केलेले कै. अशोक भाऊ गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😢🙏🙏🙏🙏

©️ पत्रकार भिकाजी मा. जाधव, सचिव कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळ कळंब, एक खंबीर कार्यकर्ता, पर्याय संस्था हासेगाव (के) तथा संपादक माझी बातमी ई न्यूज महाराष्ट्र.

from माझी बातमी https://ift.tt/3guXa4O
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!