मराठवाडा

#Be_Positive_Always #वय९७_स्कोअर_१९_,#पोटाच्या_आजाराने_त्रस्त_तरी_कोरोना_वर_केली_मात

Share Now

प्रशांत सोनटक्के (उस्मानाबाद) –
माझे आजोबा #विश्वंभर सिताराम सोनटक्के  (वय ९७ ) यांना ६ डिसेंबर२०२० रोजी कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने उस्मानाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान दुसऱ्या दिवशी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला,त्याच दिवशी एचआरसिटी टेस्ट केली स्कोअर जास्त म्हणजे १९ आल्याने कुटुंबातील सर्व सदस्याचे टेंशन वाढले. लगेच #डॉ_सचिन_गायकवाड आणि #डॉ_ निपाणीकर यांच्या निगराणी खाली उपचार सुरू झाले. पहिल्या आठ नऊ दिवसात रेमडेसिव्हरच्या ६ इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाला तरी ऑक्सिजन लेव्हल काय ८० च्या वरी गेली नव्हती. त्यामूळे अजून आमचे टेंशन वाढले होते. 
पुन्हा एकदा एचआरसिटी टेस्ट केली स्कोअर आहे तोच 22 राहिला होता,म्हणून पुन्हा रेमडेसिव्हर चे इंजेक्शन देईला सुरुवात केले, परत मात्र पोटाचा आजार वाढला पूर्ण पोट भुगले, सु शी साफ होना गेली, डॉक्टरनी जगणेची शाश्वती कमी सांगितली ,त्यातच ह्रदय म्हणावे तेवढे काम करत नसल्याचे सांगितले, त्यासाठी इको टेस्ट करून घेणेचा डॉक्टरनी सल्ला दिला, इको साठी खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची वेळ आली तेव्हा काही वेळेतच आमचे मित्र १०८चे जिल्हा समनव्यक (आपत्कालीन वैद्यकीय सेवा) #जयराम_शिंदे यांनी १०८ची त्वरित व्यवस्था केली, टेस्ट करून झाली, रिपोर्ट नॉर्मल आला. तरी पोट कमी होत  नव्हते हात पाय सुजले, सोनोग्राफी केली.  
या नंतर डॉ.सचिन गायकवाड आणि डॉ. निपाणीकर सर यांनी योग्य ट्रीटमेंट करत करत आजोबांना धोकेच्या बाहेर काढले.. जवळजवळ २७ दिवस ऍडमिट असलेले आजोबा यांनी ३१ डिसेंबर २०२० ला डिस्चार्ज घेतला. घरी काही दिवस ऑक्सिजन द्यावे लागले आज ९७ वय वर्षे असलेले माझे आजोबा आता एकदम ठणठणीत आहेत.
सिव्हिल हॉस्पिटल मधील एम आय सी यू वार्डातील सर्व स्टाफचा आम्ही सत्कार केला आणि दोन्ही डॉक्टरनी आमच्या आजोबांचे स्थैर्य पाहून त्यांनी उपचाराला दिलेला प्रतिसाद पाहुन आजोबांचे कौतुक करून सत्कार केला. 
#तात्पर्य:- ९७ वयाचे आजोबा कोरोनावर मात करू शकतात मग आपण का नाही??  कोरोनाला न घाबरता जिद्द व इच्छाशक्ति  असल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य आहे.
सिव्हिल हॉस्पिटल म्हणले की अनेकांच्या अंगावर काटा येतो मात्र याला उस्मानाबादचे सिव्हिल हॉस्पिटल  अपवाद आहे.. तेथील सुसज्ज इमारत , ऊत्तम आय सी यू वार्ड , थोडक्यात खाजगी हॉस्पिटल पेक्षा सर्व गुण संपन्न अशी व्यवस्था आपल्या उस्मानाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असून  त्यात कोरोनाच्या उपचारासाठी एकदम चांगले आहे. फक्त रुग्णांनी खचून न जाता धैर्याने तोंड देणे गरजेचे आहे.

from माझी बातमी https://ift.tt/3aDUfDc
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!