मराठवाडा

‘अभयारण्य’ स्पर्धा

Share Now

ठाण्यातील अजेय संस्थेने ‘अभयारण्य चला निसर्ग होऊ या या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याची अंतिम फेरी १ मे रोजी फेसबुकवर zapurza page वर लाइव्ह होणार आहे. त्याचबरोबर प्रथमेश जोशी, ओंकार कदम, श्वेता कोहोजकर हे तीन प्राणिमित्र प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.
या स्पर्धेत अनेक जणांनी सहभाग घेऊन अभयारण्यातील विविध घटक जसे की प्राणी, पक्षी, नद्या सरोवरे, पर्वत, तलाव असे घटक निवडले आहेत. अभयारण्य, जंगल त्यांचे महत्व आणि आत्ताच्या काँक्रिट जंगल उभारणी च्या काळात नैसर्गिक सृष्टीचा होत असलेला ऱ्हास यावर अभयारण्य या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ९९३०१७५५२७ किंवा ८९२८८६४१७१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.


Share Now
error: Content is protected !!