मराठवाडा

coronavirus in maharashtra: किंचित दिलासा; आज नव्या करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक, मृत्यू ७७१

Share Now

मुंबई: राज्यात नव्या बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ सुरूच असली तरी आज निदान झालेल्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६६ हजार १५९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज एकूण ६८ हजार ५३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ६७ हजार ७५२ इतकी होती. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ६३ हजार ३०९ इतकी होती. कालच्या तुलनेत आज वाढ झाली असून हा फरक २ हजार ८५० इतका आहे. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ७० हजार ३०१ वर जाऊन पोहचली आहे. ( Latest updates)

आज राज्यात एकूण ७७१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ९८५ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ६८ हजार ५३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६९ टक्क्यांवर आले आहे.

पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ७० हजार ३०१ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढली असून येथे राज्यात सर्वाधिक १ लाख ०४ हजार ५२९ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ६७ हजार २५५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ५६ हजार ९७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ८० हजार ०२८ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५२ हजार ९५४ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये २३ हजार १२४ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १४ हजार ६४९, नांदेडमध्ये ही संख्या ९ हजार ३६० इतकी आहे. जळगावमध्ये १३ हजार ३९३, तसेच तर रायगडमध्ये एकूण १३ हजार ९०९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ७ हजार २४३, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ८०३ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ९३५ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

४१,१९,७५९ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ६८ लाख १६ हजार ०७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४५ लाख ३९ हजार ५५३ (१६.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१ लाख १९ हजार ७५९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३० हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gNPoDj
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!