मराठवाडा

‘घाटी’ला ५० लाखाचा निधी देणार; आमदार सतीश चव्हाण यांची घोषणा

Share Now

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी ५० लाख रूपये आमदार निधी देण्याचे जाहीर केले आहे. (mla announced to provide )

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार सतीश चव्हाण यांनी गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) भेट दिली. घाटीतील सर्व विभागप्रमुखांशी त्यांनी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, विशेष कार्यअधिकारी डॉ.सुधीर चौधरी, वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुरेश हरबडे, डॉ.एल.एस.देशमुख, डॉ.ज्योती बजाज, डॉ.प्रभा खैरे, डॉ.माधुरी कुलकर्णी, डॉ.श्रीनिवास गडप्पा उपस्थित होते. रूग्णांवर उपचार करताना येणाऱ्या अडचणी, उपचारासाठी उपलब्ध उपकरणे, आवश्यक उपकरणे, मनुष्यबळाची सद्यस्थिती या विषयांचा चव्हाण यांनी आढावा घेतला. घाटीत कोविडचे गंभीर रूग्ण मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत. या रूग्णांकरिता विविध यंत्रसामुग्री व इतर उपकरणे यांची आवश्यकता असते. सध्या घाटीत उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री व इतर उपकरणे हे रूग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे उपचाराकरिता कमी पडत असल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले.

क्लिक करा आणि वाचा-

संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हा पातळीवर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कार्यवाहीला बळ देण्यासाठी राज्य शासनाने १६ एप्रिल रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना प्रत्येकी एक कोटी रूपये निधी देण्याचा निर्णय घेतला. घाटीत सद्यस्थितीत वैद्यकीय यंत्रसामुग्री कमी पडत असल्याने यातील ५० लाख रूपये निधी घाटी प्रशासनाला देणार असल्याचे चव्हाण यांनी बैठकीत सांगितले. मागच्या वर्षी करोनाच्या संकट काळात चव्हाण यांनी घाटीला वैद्यकीय यंत्रसामुग्रीसाठी १० लाखाचा आमदार निधी उपलब्ध करून दिला होता.

क्लिक करा आणि वाचा-

एक दिवसाचा साठा

घाटीत झालेल्या बैठकीत रेमडेसिविर आजपर्यंतच पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याचे घाटी प्रशासनाने चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले. चव्हाण यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांच्याशी फोनव्दारे संपर्क करून रेमडेसिविर इंजेक्शन घाटीला उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार सायंकाळी घाटी प्रशासनाला रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले.

क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vsKq35
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!