मराठवाडा

करोनावरील उपचारपद्धतीमध्ये आयुर्वेदिक ‘आयुष ६४’ या समावेश

Share Now

म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाग्रस्तांवर केंद्र सरकारने निश्चित केलेल्या उपचारपद्धतीमध्ये आयुर्वेदिक ‘’ या औषधाचा समावेश करण्यात आला आहे. या औषधावर झालेल्या संशोधनातून सौम्य, मध्यमस्वरुपाची लक्षणे असलेल्या करोनाबाधितांवर हे औषध उपयुक्त ठरत असून त्यामुळे वेगाने आजार बरा होतो. या औषधामुळे रुग्ण गंभीर होण्यापासून वाचतो तसेच हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक ठरले आहे, असे निष्कर्ष या संशोधनातून समोर आले आहेत. ( is one of the )

आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक, औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) संयुक्त संशोधनातून हे आयुर्वेदिक औषध ‘आयुष ६४’ करोनाग्रस्तांवर उपयुक्त ठरत आहे. आयुष मंत्रालयाचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर तसेच इंटर डिसिप्लनरी आयुष रिसर्च अन्ड डेव्हलपमेंट टास्क फोर्स ऑन कोव्हडीचे चेअरमन डॉ. भूषण पटवर्धन तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आय़सीएमआर) माजी संचालक डॉ. व्ही.एम. कटोच यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी संशोधनाचे प्रमुख डॉ. अरविंद चोप्रा, सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्चन इन आयुर्वेदिक सायन्ससेच (सीसीआरएएस) महासंचालक डॉ. एन. श्रीकांत आदी यावेळी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा-
मलेरियाच्या आजारावर १९८० साली आयुष ६४ हे आयुर्वेदिक औषध विकसित करण्यात आले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर काही औषधांचा पुर्नवापर सुरु करण्यात आला. त्यानुसार ‘आय़ुष ६४’ याच्यासह काही औषधांचा उपयोग होईल का म्हणून संशोधनाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबई, वर्धा आणि लखनौ येथील मोठ्या तीन रुग्णालयांमध्ये २१० रुग्णांवर जागतिक पद्धतीने क्लिनिक ट्रायलनुसार प्रोटोकॉल तयार केला. तो तज्ज्ञांकडून तपासून घेण्यात आला. आयसीएमआरचे मार्गदर्शन घेण्यात आले. डॉ. चोप्रा यांनी निष्कर्ष जाहीर केले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gQxNe6
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!