मराठवाडा

खासदार राजीव सातव यांची करोनाशी झुंज; व्हेंटिलेटरवर असले तरी…

Share Now

पुणे: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य यांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर पुणे येथील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती खालावल्याने २५ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून कालपासून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. ‘राजीव सातव यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत आणि करोनावर ते निश्चितपणे मात करतील असा माझा विश्वास आहे’, असे आज रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर राज्यमंत्री यांनी सांगितले. ( MP )

वाचा:

राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी जहांगीर रुग्णालयाला भेट दिली. सातव यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर कदम यांनी ताजे अपडेट्स माध्यमांना दिले. राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून बरं वाटत नव्हतं. कोविडची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांनी २१ एप्रिल रोजी चाचणी करून घेतली. २२ एप्रिल रोजी या चाचणीचा अहवाल आला. त्यात सातव यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २३ एप्रिल रोजी ते जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. उपचारांनंतर त्यांची प्रकृती उत्तम होती मात्र, २५ एप्रिलला त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे तातडीने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तिथे कोविडवरील उपचार ते घेत असले तरी कालपासून प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, असे विश्वजीत कदम यांनी सांगितले.

वाचा:

राजीव सातव व्हेंटिलेटरवर असले तरी त्यांची इच्छाशक्ती बळकट असल्याने ते निश्चितपणे करोनावर मात करतील व पुन्हा जनतेच्या सेवेत दाखल होतील, असा विश्वास वाटतो, अशा भावना कदम यांनी व्यक्त केल्या. सातव यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. कोविडवर उपयुक्त ठरत असलेली रेमडेसिवीर व टोसिलीझुमॅब ही इंजेक्शन त्यांना देण्यात आलेली आहेत. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होईल, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे, असेही कदम यांनी नमूद केले. मुख्यमंत्री , काँग्रेस अध्यक्षा , खासदार राहुल गांधी यांनी सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. कोविड टास्क फोर्सचे शशांक जोशी तसेच राहुल पंडित हे सुद्धा सातव यांच्यावर होत असलेल्या उपचारांवर लक्ष ठेवून आहेत, असेही कदम यांनी सांगितले.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Rd2GOU
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!