मराठवाडा

उन्हाळा वाढलाय, कोविड वॉर्डात कूलर लावा; ‘या’ मंत्र्याने दिल्या दमदार सूचना

Share Now

गडचिरोली: जिल्ह्यात उपचारासाठी एकही खासगी रुग्णालय नसताना जिल्ह्यातील सर्व रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा देवून जिल्हा सामान्य रुग्णालयाने मोठे काम केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा टीम वर्कने अतिशय चांगले काम करत आहे, अशा शब्दांत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा मदत व पुनर्वसन मंत्री यांनी कौतुक केले. करोनाबाबत सद्यस्थिती व विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी वडेट्टीवार गडचिरोली येथे आले होते. त्यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्सची उपलब्धता याची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक मदत देण्यासाठी सहकार्य करा व रुग्णांची तपासणी प्रोटोकॉलनुसार करून चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्या, असे निर्देश आरोग्य विभागाला दिले. ( )

वाचा:

वडेट्टीवार यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्ड येथे जावून पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी रूपरेषा तयार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील पॉझिटीव्हिटी दर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरा आहे. मात्र करोना मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या नियंत्रणात येणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील डबलिंग रेटही खूप असून आपल्याला संसर्ग साखळी तोडण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेणे पण आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी राज्याच्या तुलनेत कमी असून लसींचा पुरवठा पूर्ववत झाल्यावर लसीकरण वाढविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

वाचा:

चांगले जेवण व कूलरची व्यवस्था करा

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. रुग्णांना चांगले जेवण व पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर्समध्ये कूलरची व्यवस्था करावी. तसेच चांगल्या दर्जाचे जेवणही पुरवावे. जेणेकरून रूग्णांना संसर्गातून बरे होण्यास मदत मिळेल अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील तापमान जास्त असल्यामुळे बहुतेक ठिकाणी काही अडचणीही आल्या पण सध्या त्या दूर करण्यात येत आहेत. याबाबत तालुकास्तरावर कार्यवाही करणेबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले. जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या एप्रिल महिन्यात झपाट्याने वाढली. ती नियंत्रित ठेवण्यासाठी राज्य शासनाने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात आवश्यक निर्बंध घातलेले आहेत. याची अंमलबजावणी नागरिकांकडून होणे आवश्यक आहे. लोकांनी विनाकारण बाहेर न पडता आपली व आपल्या कुटुंबांची जबाबदारी घ्यावी असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले. बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोविड स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पोरेड्डी पाटील, जिल्हा परिषद सदस्य ॲड. हरीभाऊ मेश्राम, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळंकी, डॉ. मुकुंद ढबाले उपस्थित होते.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2PwANku
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!