मराठवाडा

राज्याच्या लसीकरण मोहिमेत काँग्रेसचा हातभार; थोरात यांनी केली मोठी घोषणा

Share Now

मुंबई: संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व नागरिकांचे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या या कामात थोडीशी मदत म्हणून आपण आपल्या एक वर्षाच्या वेतनाचे आणि पक्षाच्या सर्व आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास २ कोटी रुपये तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याची घोषणा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे महसूल मंत्री यांनी केली आहे. ( )

वाचा:

रॉयलस्टोन निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना थोरात यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, देशात आणि राज्यात करोना संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वेगवान पद्धतीने आणि वेळेत सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हाच करोनावरील सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचे आवाहन केले होते. पण केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने करोना संकटकाळात आपल्या जबाबदारीपासून पळ काढत लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलली आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधामुळे उद्योग, व्यापार आस्थापना बंद असल्याने अनेक राज्ये आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी राज्यांना मदत करणे तर दूरच राहिले, केंद्र सरकार राज्याच्या हक्काचे पैसेही देत नाही. अशा विपरित परिस्थितीतही काँग्रेस पक्षाच्या मागणीवर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले असून करोना विरोधी लढ्याला बळ देण्यासाठी आपल्या परीने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा:

राज्य सरकारने घेतलेल्या मोफत लसीकरणाच्या निर्णयाच्या अंमलबजावीसाठी हातभार म्हणून विधानसभा सदस्य म्हणून माझ्या एक वर्षाच्या वेतनाची आणि काँग्रेस पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषेतील ५३ आमदारांच्या एका महिन्याच्या वेतनाची अशी एकूण जवळपास २ कोटी रुपयांची रक्कम, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ५ लाख रुपये इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी काही सहकारी संस्थांचे नेतृत्व करतो, अमृत उद्योग समूहातील या सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या खर्चाची रक्कम त्या सहकारी संस्था स्वीकारणार असून, त्यासाठी येणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे, असेही थोरात यांनी नमूद केले.

वाचा:

काही तरुण मंडळीही या विधायक कार्यात पुढाकार घेत आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जे नागरिक लसीकरणाचा खर्च स्वतः उचलू शकतात त्यांनी लसीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन केले आहे. तर मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक यांनी स्वतः आणि इतर पाच व्यक्तींच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे मी कौतुक करतो. करोना रुग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजन, औषधे, वैद्यकीय उपकरणे अशा विविध गोष्टींची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेली ही मदत गरीब रुग्णांसाठी आवश्यक साम्रगी खरेदी करण्यासाठी उपयोगात येऊ शकते. त्यामुळे राज्यातील इतर राजकीय पक्ष, सहकारी संस्था औद्योगिक आस्थापना यांनी आपल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3e3L5lH
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!