मराठवाडा

पुण्यातील आमदाराचं जयंत पाटील यांना पत्र; शहराध्यक्षपद सोडणार

Share Now

पुणे: हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व पुणे शहराध्यक्ष यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांना पत्र लिहिलं असून शहराध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला या पदावर काम करण्याची संधी मिळावी, असं तुपे यांनी पत्रात म्हटलं आहे. पक्षानं तुपे यांची विनंती मान्य केल्यास त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडं आता लक्ष लागलं आहे.

वाचा:

चेतन तुपे हे मागील अडीच वर्षांपासून राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. मतदारसंघात काम करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांनी आता शहराध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘आपल्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्षाचा जनाधार व्यापक करण्यासाठी काम केले. त्यातून बरंच काही शिकता आलं. अनेक समस्यांची जाण व भान आले. पुढील काळात याचा मला निश्चितच उपयोग होईल.’

वाचा:

‘हडपसर विधानसभा मतदारसंघात ५ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. त्यात समाजातील विविध घटकांचा समावेश आहे. या सगळ्यांशी संपर्क ठेवण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. स्वहितापेक्षा पक्षहिताला प्राधान्य देणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती तुपे यांनी पत्राद्वारे केली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/335HFIE
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!