मराठवाडा

Pune : फार्म हाउसमधील डान्स बारवर छापा; नऊ जणांना अटक

Share Now

म. टा. प्रतिनिधी,
उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुडजे गावातील लबडे फार्म हाउसमध्ये सुरू असलेल्या डान्स बारवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री छापा टाकला. यात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिसांनी फार्म हाउसवर छापा टाकून ही कारवाई केली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून काही आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या असून, त्यामध्ये महागड्या दारूच्या बाटल्यांचादेखील समावेश आहे. पाच मुलींची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (३९, रा. आगळंबे फाटा, ता. हवेली), विवेकानंद विष्णू बडे (रा. नवी सांगवी), प्राजक्ता मुकुंद जाधव (२६, रा. सांताक्रुझ, मुंबई), मंगेश राजेंद्र शहाणे (३२, रा. अरण्येश्वर), ध्वनीत समीर राजपुत (२५), नीलेश उत्तमराव बोधले (२९, दोघेही रा. पुरंदर हाउसिंग सासोयटी, म्हाडा कॉलनी) यांच्यासह निखिल सुनील पवार (३३, रा. पर्वती दर्शन), सुजित किरण आंबवले (३४, रा. बालाजीनगर) आणि आदित्य संजय मदने (२४, रा. अंधेरी पूर्व, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.

पायगुडे, बडे आणि जाधव यांना न्यायालयाने तीन मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, इतर आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

पोलिसांनी कुडजे गावतील लबडे फार्म हाउसवर बुधवारी रात्री अकराच्या सुमारास छापा टाकला. त्या वेळी डीजेच्या तालावर तरुणी नाचत असल्याचे आढळून आले; तसेच वेश्या व्यवसायही सुरू असल्याचे आढळले. पायगुडे आणि बडे यांनी या पार्टीचे आयोजन केले होते, असे उत्तमनगर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xzn11R
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!