मराठवाडा

पुणे: आयटी इंजिनीअर तरुणी पहाटे घराकडे निघाली, कुणीतरी पाठलाग करत होता, तेवढ्यात..

Share Now

म. टा. प्रतिनिधी, : कंपनीतून पहाटे घरी निघालेल्या आयटी इंजिनीअर तरुणीचा एकाने पाठलाग केला. तरूणी घाबरून स्पीड ब्रेकरवर पडल्यानंतर तिचे कपडे फाडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढव्यातील परिसरात गुरूवारी पहाटे घडला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका २७ वर्षाच्या तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अनोखळी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करते. गुरूवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास काम संपवून घरी निघाली होती. दुचाकीवरून ती केशवनगर येथून एकटीच घरी जात होती. त्यावेळी एका व्यक्तीने ती एकटी असल्याचे पाहिले. त्यानंतर तिचा पाठलाग सुरू केला.

त्या व्यक्तीच्या तोंडाला मास्क होता. तसेच, अंगावर शर्ट देखील नव्हता. त्यामुळे तरूणी घाबरून दुचाकी वेगाने चालवू लागली. घराकडील रस्त्यावरील सोसायटीजवळ रस्त्यावर असलेल्या एका स्पीडब्रेकरवर दुचाकी घसरली. तरुणी खाली पडली. त्यावेळी ती व्यक्ती तिच्याजवळ गेली. त्याने तरुणीचे कपडे फाडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने आरडाओरडा केला. आजूबाजूचे नागरिक धावून येतील या भीतीने तो तेथून पळून गेला. त्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Sf7SCG
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!