मराठवाडा

पुणे: करोनासंदर्भातील भीती दूर करण्यासाठी हडपसरमध्ये राबवला ‘हा’ प्रयोग

Share Now

म.टा. प्रतिनिधी,

हंडेवाडी रोड येथील विरंगुळा केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांमधील भीती दूर करण्याकरिता शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना समुपदेशन करत शांततेत लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांमधील करोना बाबतची भीती दूर करण्यासाठी महापालिकेचे डॉक्टर व शिवसैनिकाचे स्वयंसेवक पथक काम करीत आहे. (hadapsar attempt to allay )

हांडेवाडी रोड श्रीराम चौकातील अशोकनगर सोसायटीच्या शेजारी महापालिकेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्रामध्ये नियोजनबद्ध लसीकरण केंद्र करण्यात येत आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी परिसरातील नागरिकांना सकाळी नंबर प्रमाणे टोकन देऊन त्या त्या वेळेत त्या व्यक्तीला बोलावून नियोजन बद्ध लसीकरण केले जात आहे. येथील केंद्रावरील डॉ. पूनमसिंग व सयंसेवक प्रकाश कलगुडे हे नागरिकांमधील गैर समज दूर करत माहिती स्पष्ट नम्रपणे समजावून सांगताना दिसत आहे. त्यामुळे नागरिक ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, सोशल डिस्टनसिंग ठेऊन रांगेत खुर्चीवर बसून नंबर येण्याची वाट पाहत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
याठिकाणी पिण्याची पाण्याची सोय करण्यात आली असून उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पंखे लावण्यात आले आहेत. केंद्रप्रमुख डॉ. पूनम सिंग यांनी सांगितले की, लसीकरण केंद्रावर जेष्ट नागरिक आनंदाने लस घेत आहेत. रोज ८० ते ९० नागरिकांना लस दिली जाते. येथील जेष्ठ नागरिक हे इतर जेष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी सांगत आहेत. याठिकाणी ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग ठेऊन लस दिली जात आहे. नागरिकांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न नगरसेवक प्रमोद भानगिरे व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे नागरिक शांत डोक्याने सहकार्य करीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vwt5X3
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!