मराठवाडा

काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीही सरसावली; मुख्यमंत्री निधीत मोठे योगदान

Share Now

मुंबई: बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीत राज्याला हातभार म्हणून काँग्रेसनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. यापैकी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे दिला जाणारा १ कोटींचा धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना नुकताच सुपूर्द केला.

वाचा:

‘महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आपत्तीला तोंड देत आहे. राज्यातील जनता व प्रशासन या संकटाविरोधात जोमाने लढत असले तरी एकूणच जगभरचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. तसेच राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला असल्याने राज्याच्या तिजोरीवर आधीपेक्षा अधिक भार पडणार आहे. पक्ष हा प्रत्येक संकटात महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच करोनाविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे, असं पक्षानं स्पष्ट केलं आहे.

वाचा:

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नागरिकांच्या सहाय्यासाठी तत्पर असल्याचे सांगतानाच या निधीचा स्वीकार करावा अशी विनंती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी अजितदादा पवार, ट्रस्टी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ट्रस्टी आणि खासदार सुप्रियाताई सदानंद सुळे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबईच्या युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eXIY2f
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!