मराठवाडा

आ.कैलास घाडगे-पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीमधून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेचे कळंब येथे लोकार्पण

Share Now

कळंब (प्रतिनिधी) दि.30
कळंब येथे कळंब-उस्मानाबाद (धाराशिव)  विधानसभा मतदारसंघाचे आ.कैलास घाडगे-पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीमधून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून कळंब उपजिल्हा रुग्णालयास सुपूर्द केले. 
कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सामान्य रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः उपचार आणि दवाखान्यापर्यंत पोहोचनेही अनेकांना अशक्‍य होते. रुग्णांची गरज ओळखून त्यांना वेळेवर उपचार उपलब्ध होण्यासाठी सुविधांची सुसज्ज असलेली रुग्णवाहिका  स्थानिक आमदार निधीमधून उपलब्ध करून दिली आहे. तालुक्यातील गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी रुग्णवाहिकेचा उपयोग होईल.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, अजय समुद्रे, विधानसभा संघटक तथा डिकसळ चे उपसरपंच सचिन काळे, पं. स.सदस्य गजेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी श्रीमती अहिल्या गाठाळ-होळे, तहसिलदार रोहन शिंदे, वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे, डॉ. अभिजित लोंढे, डॉ.अभिजित जाधवर, डॉ.स्वप्निल शिंदे, बालरोगतज्ज्ञ डॉ.विवेक शिंदे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हर्षद अंबुरे, दिलीप पाटील आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

from माझी बातमी https://ift.tt/3xBGSxl
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!