मराठवाडा

लॉकडाऊनबाबतचा ‘तो’ व्हायरल मेसेज; मुंबई पालिकेचे तातडीचे स्पष्टीकरण

Share Now

मुंबई: राज्यात वाढवण्यात आल्यानंतर व आधीचेच निर्बंध कायम राहणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केल्यानंतर महापालिकेने नवीन नियमावली जारी केल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत प्रशासनाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. ( )

वाचा:

मुंबईत १ मे पासून लागू करण्यात येत असल्याचे नमूद करणारा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या मेसेजमुळे संभ्रम आणि गोंधळ निर्माण झाला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत मुंबई महापालिकेने ट्वीटरच्या माध्यमातून त्याबाबत तातडीचं स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेली ही माहिती खोटी असून मुंबई महापालिका प्रशासनाने असे कुठलेही नियम जाहीर केलेले नाहीत, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्वेच मुंबईतही लागू असतील, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पसरवूही नये, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.

वाचा:

‘तो’ व्हायरल मेसेज नेमका काय?

मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येत आहे. १ मे पासून नव्या लागू असतील, अशा शिर्षकाखाली मुंबई महापालिकेचा लोगो वापरून हा फेक मेसेज बनवण्यात आला आहे. गॅस एजन्सी दररोज सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार, स्टेशनरी शॉप मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार, औषध दुकाने सर्व दिवस २४ तास सुरू राहणार, किराणा दुकाने आणि दूध विक्री केंद्रे सर्व दिवस सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार, चपला आणि कपड्यांची दुकाने सोमवार आणि गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुली राहणार, जनरल स्टोअर्स मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार, घाऊक भाजी बाजार सर्व दिवस सकाळी ५ चे सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहणार, डॉमेस्टिक रिपेअर्ससाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ असेल, असे यात नमूद करण्यात आले आहे. हा पूर्ण मेसेज फेक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले असून FAKE असा शिक्का मारून ती इमेज पालिकेने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर पोस्ट केली आहे.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xBQZlO
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!