मराठवाडा

मुंबईतील करोनाची लाट ओसरतेय!; ‘ही’ आहे दिलासादायक आकडेवारी

Share Now

: देशभरात करोनाने रौद्र रुप धारण केलेलं असताना मुंबईत मात्र या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. शहरात करोना चाचणीच्या पॉझिटिव्हिटीचा दर १० टक्क्यांहून खाली घरसला आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल (BMC commissioner ) यांनी माहिती दिली आहे.

‘२९ एप्रिल रोजी मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर ९.९४ टक्के इतका आढळला आहे. गुरुवारी मुंबईत एकूण ४३ हजार ५२५ नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली. त्यातील ४ हजार ३२८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जवळपास ४४ हजार चाचण्या केल्यानंतरही शहरातील पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी आढळला आहे,’ असं इक्बालसिंह चहल म्हणाले.

‘८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत’मुंबई शहरात नव्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचं सांगत पालिका आयुक्त म्हणाले की, ‘तब्बल ८५ टक्के रुग्ण लक्षणंविरहीत आहेत. त्यामुळे शहरात उपलब्ध असणाऱ्या बेड्सची संख्या वाढली असून ती आता ५ हजार ७२५ इतकी झाली आहे.’

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शहरात करोना चाचण्यांचा पॉझिटिव्ही दर २०.२५ टक्के होता, तर ४ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या करोना चाचण्यांच्या तुलनेत उच्चांकी २७.९४ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. हा दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, देशभरात करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू झाल्यानंतर मुंबईतही करोनाने धुमाकूळ घातला होता. रुग्णवाढीचा दर प्रचंड असल्याने आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आला. परिणामी आरोग्य सुविधांअभावी अनेक रुग्णांचे हाल झाले. मात्र लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीनंतर करोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Rb0gRd
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!