मराठवाडा

असाच संयम दाखवा!; लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांचे मोठे विधान

Share Now

मुंबई: राज्यातील संसर्गाची भीषण स्थिती लक्षात घेता १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवण्याचा आदेश आधीच देण्यात आलेला असताना मुख्यमंत्री यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या आदल्या दिवशी राज्यातील जनतेला संबोधित केले व महत्त्वाचे आवाहन केले. राज्यात सध्या जे निर्बंध लादले आहेत ते पुरेसे आहेत. यापेक्षा अधिक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही असे मला वाटते, असे महत्त्वाचे विधान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ( )

वाचा:

राज्यात १५ दिवस संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करा, असे मुंबई हायकोर्टाने गुरुवारी राज्य सरकारला सांगितले आहे. त्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली. हायकोर्टाने कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार करायला सांगितले आहे. त्यावर तुम्हाला आणखी कडक निर्बंध हवे आहेत का, अशी विचारणा मी जनतेला करत आहे. मला वाटते जनतेचे उत्तर नको असे असेल. मलाही तसेच वाटत आहे. तुम्ही जो संयम आणि समजूतदारपणा दाखवत आहात ते पाहता यापेक्षा अधिक कडक निर्बंध लावण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असा विश्वास मला वाटत आहे. त्यासाठी मला तुमचे सहकार्य हवे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

वाचा:

संपूर्ण देश आज करोनाच्या खदखदत्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. महाराष्ट्रात आपण निर्बंध घातले नसते व संयम दाखवला नसता तर महाराष्ट्राची स्थितीसुद्धा आज भीषण झाली असती. सुदैवाने गेले काही दिवस आपल्या राज्यातील करोनाचे आकडे स्थिर झाले आहेत. ते आकडे कमी करण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला यापुढेही संयम दाखवायचा आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांचाही तपशील दिला. आपण लॉकडाऊन केला आणि हात लॉक करून ठेवलेत असे झालेले नाही. आपण हातपाय हलवत आहोत. फिल्ड हॉस्पिटलची संख्या आपण वाढवली आहे. आता राज्यात साडेपाच हजार कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. ऑक्सिजन सुविधा, बेड्स याबाबत आपण सातत्याने काम करत आहोत. आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर आपला भर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aRLyVX
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!