मराठवाडा

लसीकरणाचा नवा टप्पा उद्यापासूनच; १२ कोटी डोस आज खरेदी करू, पण…

Share Now

मुंबई: राज्यात लससाठा उपलब्ध नसल्याने १५ मे पर्यंत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे कोविड सुरू करता येणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच मुख्यमंत्री यांनी खूप मोठी दिलासा देणारी बातमी दिली आहे. राज्यात ठरल्यानुसार उद्या १ मे पासूनच लसीकरण सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यासोबत काही महत्त्वाच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्वांनाच केल्या आहेत. ( )

वाचा:

केंद्राने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारांकडे सोपवली आहे. आपल्या राज्यात या वयोगटात सुमारे ६ कोटी नागरिक असून प्रत्येकी दोन डोस याप्रमाणे आपल्याला १२ कोटी डोस लागणार आहेत. या डोसच्या खरेदीसाठी जे पैसे लागणार आहेत ते एकरकमी चेकने देण्याची आज आपली तयारी आहे. मात्र, तितका लससाठा सध्या उपलब्ध नसल्याने आपली कुचंबणा झाली आहे. याबाबत केंद्र सरकारला आमची विनंती आहे. त्यांनी लक्ष घालून हा लससाठा आम्हाला उपलब्ध करून द्यावा. म्हणजे आम्ही लवकरात लवकर या संकटावर मात करण्यात यशस्वी करू, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केले.

वाचा:

राज्याला आज तीन लाख लस उपलब्ध झाल्या आहेत. त्याचे रुग्णसंख्या आणि लोकसंख्या या प्रमाणात जिल्ह्यावार वितरण करण्यात आले आहे. त्यातून उद्या महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले जाणार आहे. ज्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे व ज्यांना मेसेज प्राप्त झाला आहे त्यांनीच संबंधित केंद्रावर लस घेण्यासाठी जावे. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी बाळगावी. तुमच्या भावना मी जाणू शकतो. सगळ्यांनाच बंधनांचा उबग आला आहे. एकेक दृष्य पाहून मन सून्न होत आहे. एकप्रकारची दहशत सर्वत्र पसरली आहे. पण हीच संयम दाखवण्याची खरी वेळ आहे. नाहीतर इतकी काळजी घेवून सगळं मुसळ केरात जाईल व लसीकरण केंद्रे ही कोविड प्रसारक मंडळे व्हायला वेळ लागणार नाही, असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

वाचा:

लसीकरणाच्या नोंदणीसाठी एकच अॅप असल्याने त्यावर भार आला आहे. त्यामुळे आजच याबाबत पंतप्रधान यांना पत्र लिहिले आहे. नोंदणीसाठी राज्यांची स्वतंत्र अॅप बनवण्यात यावीत आणि त्या अॅपशी केंद्राचं अॅप लिंक करावं, अशी विनंती त्यात केली आहे. ही विनंती मान्य झाल्यास लसीकरण नोंदणीचा जो गोंधळ सुरू आहे तो थांबेल व लसीकरण सुरळीत पार पडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gT9jAW
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!