मराठवाडा

दुचाकीस्वारांना उडवून टँकर दुकानात घुसला; बुलडाण्यात भयंकर अपघात

Share Now

बुलडाणा: दुचाकीस्वारांना धडक देत व रस्त्यावरील दुभाजक तोडून एक टँकर थेट दोन दुकानांना धडकल्याची घटना रात्री ११ वाजताच्या सुमारास येथे नांदुरा रोडवर घडली. यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून दोन दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकामुळं हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

अपघातग्रस्त टँकर नांदुराहून येत होता. खामगाव जवळ असताना रस्त्यावरील दुचाकीस्वारांना उडवत हा टँकर काही अंतरावरील दुभाजक तोडून थेट दोन दुकानांवर जाऊन धडकला. या धडकेमुळं दुकानाला लागून असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील तारा देखील तुटल्या. यावेळी रस्त्यांवर नागरिक नसल्यानं सुदैवाने मोठी हानी टळली.

वाचा:

टँकरचा वेग पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकारांचाही थरकाप उडाला होता. त्यांनी या अपघातातील दोन गंभीर जखमींना तात्काळ रुग्णालयात भरती केले. टँकरनं धडक दिलेले हॉटेल व हेअर सलूनचे मोठे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी, या टँकरने काही अंतरावर एका ट्रॅव्हल्सला देखील कट मारल्याने मोठा अपघात टळल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसात योगेश निंबाळकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टँकर चालक राजेंद्र यादव (रा. बानोसा झारखंड) याच्याविरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास खामगाव पोलीस करत आहे.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u9wMlf
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!