मराठवाडा

Live: महाराष्ट्रात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

Share Now

महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत आजपासून राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. राज्यात कोविड लसीचा साठा मर्यादित असल्यानं लसीकरणही टप्प्याटप्प्यानं होणार आहे. जाणून घेऊन लसीकरणाच्या संदर्भातील सर्व ताज्या घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स

पुणे जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पुढील दोन दिवसांसाठी बंद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

अहमदनगर: तरुणाईला लसीकरणाची प्रतीक्षाच, मोजकेच डोस शिल्लक असल्याने केवळ ४५ वर्षांवरील तेही दुसरा डोस असलेल्यांनाच मिळणार लस – महापालिका आयुक्त शंकर गोरे यांची माहिती

मुंबईत सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद. नवीन लस साठा आल्यानंतर पुन्हा सुरू होणार लसीकरण

मुंबईत दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार लसीकरण.

लसीकरणासाठी नोंदणी केलेल्यांनाच देण्यात येणार लस

मुंबईत नायर हॉस्पिटल, बीकेसी जम्बो कोविड सेंटर,कूपर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची सोय

मुंबईत पाच केंद्रावर आज १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार

मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्याला सर्वाधिक २० हजार डोसचे वितरण

लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यातील विविध जिल्ह्यांना लसीच्या डोसचे वाटप

राज्यात सध्या लसींचे फक्त तीन लाख डोस उपलब्ध. लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुख्यमंत्री यांच्या घोषणेनंतर जिल्ह्याजिल्ह्यात लसीकरणाची जय्यत तयारी

आतापर्यंत १ कोटी ५८ लाख ८८ हजार १२१ व्यक्तींचे झालेय लसीकरण

महाराष्ट्रात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eLQVXT
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!