मराठवाडा

राज्याच्या मदतीसाठी लतादीदी सरसावल्या; मुख्यमंत्री निधीत दिले योगदान

Share Now

मुंबई : करोना व्हायरसमुळे देशभरात अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. महाराष्ट्र राज्यही याला अपवाद ठरलं नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली. बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि इंजेक्शन यांसारख्या प्राथमिक सुविधांसाठीही रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावं लागत असल्याचं चित्र आहे. अशा संकटकाळात अनेक सेलिब्रिटी मदत करत असतानाच गानसम्राज्ञी () यांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे.

करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लता मंगेशकर यांनी 7 लाख रुपये दिले आहेत. लतादीदींकडून ही मदत देण्यात आल्यानंतर राज्याचे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांनी इतर नागरिकांनाही याबाबत आवाहन केलं आहे.

‘सामाजिक दायित्त्वाच्या भावनेतून लतादीदींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देऊ केली आहे. राज्यातील इतर नागरिकांनी शक्य तेवढी मदत द्यावी आणि करोनाविरुद्धच्या लढ्याला बळ द्यावं,’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान, करोना व्हायरसने महाराष्ट्राला धडक दिल्यापासून अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत दिली आहे. उद्योग, व्यापार, कला, क्रीडा या क्षेत्रांतील दिग्गजांसह राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी आपला खारीचा वाटा उचलत या निधीसाठी मदत केल्याचं पाहायला मिळालं आहे.

राज्याप्रमाणेच देशातही करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आर्थिक बळ मिळावं यासाठी पीएम केअर फंडाची स्थापना करण्यात आली आहे. अनेक सेलिब्रिटींकडून या फंडातही मदत दिली जाते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QC8r9f
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!