मराठवाडा

ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा साठा ‘पॉवरफुल’ मंत्र्यांच्या जिल्ह्यात; फडणवीसांचा गंभीर आरोप

Share Now

पालघरः केंद्र सरकारने राज्याला ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप करताना योग्य नियोजन केलं आहे. मात्र, महाराष्ट्रात जिथे पॉवरफुल मंत्री आहे त्यांच्याच जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा साठा चालला आहे, असा आरोप राज्याचे विरोधीपक्ष नेते यांनी केला आहे. पालघर येथं कोविड सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. (oxygen shortage)

‘केंद्र सरकारने सर्वात जास्त ऑक्सिजनचा साठा महाराष्ट्राला केला आहे. रेमडेसिवीरचा ४० हजारचा कोटा वाढवून जवळपास ४ लाख ७५ हजार रेमेडेसिवीरचा कोटा महाराष्ट्राला मिळाला आहे. केंद्र सरकारने राज्यांना ऑक्सिजन व इतर सामग्रीचं वाटप करताना नियोजन केलं आहे. मात्र, महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाहीये. जिथे पॉवरफुल मंत्री आहे तिथं ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा जास्त साठा जातोय. ऑक्सिजनचं वाटप योग्य प्रमाणात झालं पाहिजे. मंत्री हे राज्याचे असताता पण त्यांनी सगळं आमच्या जिल्ह्यात यावं अशी मानसिकता न ठेवता जे कमी आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा प्रयत्न करणं गरजेचं आहे,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


‘कोविडच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण पाहायला मिळत आहेत. मागच्या लाटेच्या तुलनेत अधिक प्रसार आज पाहायला मिळतोय. महाराष्ट्र हा करोना संसर्गाचा केंद्र बनला आहे. सर्वाधिक रुग्ण, मृत्यू आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आपल्या राज्यात आहे. त्यामुळं, चिंताजनक परिस्थिती आपल्याकडे पाहायला मिळतेय. पूर्वी परिवारातील एखादा व्यक्ती करोनाग्रस्त व्हायचा मात्र आता संपूर्ण परिवाराला करोनाची लागण होताना दिसत आहे. यावेळच्या संसर्गात सर्व प्रकारच्या स्तरातील लोकांना लागण होताना दिसतेय,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रुग्ण वाढत असल्याने आरोग्यव्यवस्था परिस्थिती हाताळण्यात कमी पडत आहे. मात्र, ७० ते ८० टक्के रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आढळत नाहीत. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना बरे केले जाऊ शकते. मात्र, करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वजण लगेच रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. परिणामी आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे. जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवरील ताणही कमी होईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3taLFSO
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!