मराठवाडा

दीपाली चव्हाण आत्महत्या; श्रीनिवास रेड्डींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Share Now

अमरावती: बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्येसंदर्भात सहआरोपी म्हणून नागपूर येथून अटक करण्यात आलेले अमरावतीचे तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांची अखेर न्यायालयीन कोठडीत १ मे रोजी रवानगी करण्यात आली आहे. वाढीव पी. सी. आर. मागण्यासाठी सरकारी पक्षाचे वकील तसेच तपास अधिकाऱ्यांकडून न्यायालयापुढे अर्ज किंवा युक्तीवाद मांडण्यात अनूपस्थिती दाखविण्यात आल्यामुळे रेड्डींना पूढील चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश एम. एस.गाडे यांच्या कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातून दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार म्हणून सर्वप्रथम उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला यास नागपूर येथून भादंवी ३०६ अन्वये आरोपी म्हणून अटक करण्यात आल्यानंतर याच गुन्हयात सहआरोपी म्हणून प्रकल्प संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रामासब्बा रेड्डी यांची देखील २८ एप्रिलच्या मध्यरात्री नागपूरच्या वनविभाग वसाहत स्थित सेमिनार हिल्स येथून अटक करण्यात आली होती. त्यामुळे सदर अटकेतून व्याघ्र प्रकल्पाच्या अभयारण्यात घडलेल्या दिपाली चव्हाण हत्याकांडांचे लपलेले गुपीत पोलीस तपासातून निष्पन्न होणार होते.

शनिवारी दि. १ मे रोजी दुपारी सह आरोपी म्हणून पोलीस कोठडी असलेले तत्कालीन निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रेड्डी यांना दुपारी १ वाजता न्यायाधीश एम. एस. गाडे यांच्या कोर्टापूढे हजर करण्यात आले. पोलीसांकडून युक्तिवाद करणारे सहकारी वकील बी.एम.भगत आणि तपास अधिकाऱ्यांच्या अनूपस्थितीत नो, हेरिंग, नो आर्गूमेंट सारख्या परिस्थितीत न्यायाधीश एम.एस. गाडे यांच्या न्यायालयाकडून बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत रेड्डींना पुढील चौदा दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.

धरणी पोलिसाच्या मार्गदर्शनात रेड्डींना विशेष पथकाच्या देखरेखेत अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात स्वाधीन करण्यात आले असून रेड्डींना अमरावतीच्या स्थानिक अंध विद्यालयात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या खुल्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QLR3if
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!