मराठवाडा

करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपुरनं दिला ‘हा’ दिलासा

Share Now

नागपूरः जिल्ह्यात दिवसभरातील सर्वाधिक करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसभरात ७ हजार ५७५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, ६ हजार ५७६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. मुंबईतही करोना नियंत्रणात येत असताना नागपूरातही दिलासादायक चित्र आहे.

करोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर नागपुर करोनाचा हॉटस्पॉट झाला होता. मात्र आता नागपुरातही दिलासादायक परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांत ७ हजार ५७५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं आजपर्यंत नागपुरात ३ लाख ३१ हजार २६८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, जिल्ह्यात सध्या ७५ हजार ६०८ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

गेल्या २४ तासांत ९९ रुग्णांनी आपले प्राण गामवले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा ७ हजार ४८७ इतका झाला आहे. तर, आज ६ हजार ५७६ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं एकूण करोना रुग्णांचा आकडा ४ लाख १४ हजार ३६३ वर पोहोचला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xEyIo4
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!