मराठवाडा

vaccination in jalgaon: जळगावात पहिल्या दिवशी लसीकरणाचा फज्जा; उसळली मोठी गर्दी

Share Now

म. टा. प्रतिनिधी,

जळगाव जिल्ह्यात लसींचा मर्यादित पुरवठा झाल्याने अवघ्या ५ केंद्रांवर प्रातिनिधिक स्वरुपात लसीकरण होणार होते. जिल्ह्यासाठी शुक्रवारी लसीचे साडेसात हजार डोस मिळाले आहेत. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर सव्वाशे ते दीडशे नागरिकांना लस दिली जाणार होती. दरम्यान, लसीचे डोस वेळेवर उपलब्ध न झाल्याने दुपारी २ वाजेपर्यंत लसीकरणाला सुरुवात न झाल्याने लाभार्थ्यांना घरी परतावे लागले. त्यानतंर लसीकरणाला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत लसीकरण सुरु होते. (a large crowd erupted in for on first day)

जळगाव जिल्ह्यासाठी या टप्प्यांतर्गत सात दिवसात साडेसात हजार डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, साठा मर्यादीत असल्याने केवळ जळगाव शहरातील पाच शासकीय केंद्रांवर लसीकरण होणार आहे. आज पहिल्याच दिवशी योग्य ते नियोजन न झाल्याने नागरिकांना सकाळपासून लस मिळू शकली नाही. दुपारी दोन वाजेपर्यंत लसीचे डोस लसीकरण केंद्रांवर पोहोचलेले नव्हते. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अनेक नागरिक सकाळी लसीकरण केंद्रावर पोहोचले. परंतु, लसीचे डोस आलेले नसल्याने ते माघारी फिरले. अखेर दुपारी एकदाची लसीकरणाला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत सुमारे ६०० ते ७०० जणांचे लसीकरण झाल्याची माहीती मिळाली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

या केंद्रांवर लसीकरण

जळगाव जिल्ह्यासाठी करोना लसीचा पुरवठा मर्यादित स्वरूपात झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रातिनिधिक स्वरूपात केवळ जळगावातील पाच शासकीय केंद्रांवर लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना करोना प्रतिबंधक लस मिळू शकणार नाही. जळगावातील शिवाजीनगरातील डी. बी. जैन रुग्णालय, शाहू महाराज रुग्णालय, सिंधी कॉलनीतील नानीबाई रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू असलेले रेडक्रॉस सोसायटी व रोटरी भवन येथील लसीकरण केंद्रांवर या वयोगटासाठी लसीकरण होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा-
जळगाव जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे देखील डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QPQDr0
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!