मराठवाडा

सर्पमित्राचा विकृत प्रताप, जंगला ऐवजी उपजिल्हा रुग्णालय परिसरात सोडले साप

Share Now

बुलडाणा: जिल्ह्याच्या मलकापूर परीसतील पकडलेले विषारी बिन विषारी जंगल परिसरात न सोडता थेट मलकापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार २९ एप्रिल रोजी घडला. या संदर्भात त्या सर्प मित्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (serpent friend released the snake in the hospital area instead of in the forest)

शहरातील मध्यभागी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत कोवीड केअर सेंटर असून या सेंटर मध्ये करोना बाधित रुग्णांवर उपचार केला जातो. तसेच अनेक जण येथे कोरोना चाचणीकरिता दिवसभर रांगेत उभे असतात. अशा गंभीर परिस्थितीत शहरातील एका अक्रम नामक सर्पमित्राने उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात काही विषारी व बिन विषारी सर्प पिशवीत आणून सोडले. हा प्रकार सुरू असतानांच उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी परिसराची साफसफाई करीत होते. दरम्यान एकामागून एक काही साप त्यांच्या निदर्शनास पडले असता त्यांनी एवढे साप कसे निघत आहेत या बाबीचा शोध घेत पाठीमागच्या परिसरात गेले असता हा अक्रम नामक तरूण तेथे साप असलेल्या पिशवींसह आढळून आला. त्याला कर्मचाऱ्यांनी हटकले व संतापही व्यक्त केला.

क्लिक करा आणि वाचा-
उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सोडण्यात आलेल्या वीस ते पंचवीस सापांपैकी पैकी काही विषारी तर काही बिनविषारी होते. महत्त्वाचे म्हणजे यातील आठ ते दहा साप मृतावस्थेत होते. तर काही अर्धमेल्या अवस्थेत होते. त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर यातील काही जिवंत असलेले विषारी साप त्याला पुन्हा कर्मचाऱ्यांनी पिशवीत भरण्यास भाग पाडले. व ते साप कर्मचाऱ्यांनी शेत शिवार परिसरात नेऊन सोडले तर मृत असलेल्या सापांना जमिनीत गाडून टाकले. तसेच येथे आता दिसू नकोस अशी तंबी त्या सर्प मित्राला दिली.

क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान घाबरलेल्या अवस्थेत त्या सर्पमित्राने या परिसरातून पळ काढला. घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आता कर्मचाऱ्यांसह भरती असलेले रुग्ण, व कोरोना तपासणी करीता दैनंदिन रित्या उपजिल्हा रुग्णालय परिसरात येणाऱ्या रुग्णांच्या मनात आता चांगलीच धडकी भरली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nEEq4r
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!