मराठवाडा

‘लाश वही है, बस कफन बदल गया है… हे पश्चिम बंगालच्या जनतेने ओळखले!’

Share Now

जळगाव: येथे रस्त्यावर लोकांमध्ये राहून काम करणारे नेतृत्व भाजपाकडे नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालात ममता बॅनर्जी यांना जनमताचा कौल मिळाला असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी व्यक्त केले आहे. ( )

वाचा:

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे रविवारी दुपारी जळगाव येथे आलेले होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलताना त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालावर आपली प्रतिक्रिया नोंदविली

पाटील म्हणाले की, राज्यात कोण जनतेसोबत राहू शकतं आणि कोण नेतृत्व करून शकतं, हे जनतेला माहीत आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांच्या काँग्रेसच्या बाजूने जनतेने कौल देत ममता बॅनर्जी यांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपला थेट केंद्रातून सर्व प्रकारची रसद पुरवली गेली पण त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्त्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला असे मला वाटते. कोणत्याही राज्याचा नागरिक लोकसभेच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो आणि राज्याच्या निवडणुकीवेळी तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्त्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते. हे सिद्ध झाले आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

वाचा:

भाजपकडील अनेक जण तृणमूलचेच होते

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून पंतप्रधान यांचा करिष्मा ओसरला का? असा विचार करण्यापेक्षा मातीशी कोण जुळला आहे, याचा विचार मतदारांनी केला. पंतप्रधान मोदींकडे जे लोक गेले होते, ते ममता बॅनर्जी यांचेच होते. ‘लाश वही है, बस कफन बदल गया है’, हे जनतेने चांगले ओळखून घेतल्याने भाजपच्या गद्दारीला धडा शिकविल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3t9ft2s
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!