मराठवाडा

गिरीश महाजनांनी जळगावची वाट लावली; शिवसेनेचा ‘हा’ मंत्री बरसला

Share Now

जळगाव: महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी शंभर-दोनशे कोटी आणू अशा वल्गना माजी मंत्री यांनी केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात त्यांनी शहराची वाट लावली, असा घणाघाती आरोप पाणीपुरवठा मंत्री व शिवसेना नेते यांनी आज केला. डीपीडीसीतून जळगाव महापालिकेला ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. याची माहिती देताना गुलाबराव पाटील बोलत होते. ( )

वाचा:

जळगाव शहर महानगरपालिकेला डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन समितीकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या निधीबाबतची माहिती देण्यासाठी अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगाव महापालिकेवरून जोरदार टीका केली. आम्ही जळगाव शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करून शहराचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करत आहोत. मात्र, पालकमंत्री असताना भाजपचे किंवा गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती रुपये दिले याची आकडेवारी दाखवावी, असे आव्हान देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

वाचा:

जिल्हा नियोजन समितीमधून एका वर्षातच ९७ टक्के निधी हा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीला मान्यता देणारा मी पहिलाच पालकमंत्री असल्याचा दावादेखील त्यांनी केला. आम्ही विकासाचे राजकारण करतो केवळ वल्गना करत नाही. जामनेर, मुक्ताईनगर, अशा तालुक्यांमध्ये देखील आम्ही निधीचे वाटप केले आहे. त्या नगरपालिकेत भाजपाची सत्ता असली तरीही निधी वाटपात कुठलाही भेदभाव केला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन हे निधी वाटपाचा वेळेस देखील केवळ भाजपचाच लोकप्रतिनिधींचा विचार करत होते, असाही आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

तापी पाटबंधारे महामंडळात काय बोंब पाडली ?

जलसंपदा मंत्री असताना पाच तालुके अवलंबून असलेल्या निम्न तापी प्रकल्पासाठी एक दमडीही गिरीश महाजन यांनी दिली नाही. केवळ भुलभुलय्या करत बाहेर फिरत राहिले जिल्ह्याकडे लक्ष दिले नाही. निष्क्रिय पालकमंत्री तेच होते, आमच्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतः काय केले ते पहावे, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Scii5S
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!