मराठवाडा

महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येत घट; ‘हा’ आकडा दिलासादायक

Share Now

मुंबईः राज्यात आज ५६ हजार ६४७ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर, ६६९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. राज्यातील शनिवारच्या तुलनेत नवी रुग्णसंख्येत कमालीची घट दिसत आहे. तसंच, करोनाबाधित मृतांचा आकडाही नियंत्रणात आला असल्याचं चित्र आहे.

आज राज्यात ५६ हजार ६४७ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर, आज दिवसभरात ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं आजपर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णबरे होण्याचे प्रमाण ८४. ३१ टक्के इतके झाले आहे.

गेल्या २४ तासांत ६६९ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर १. ४९ टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७० हजार २८४ रुग्णांचे करोनामुळं प्राण दगावले आहेत.

अॅक्टिव्ह रुग्ण

महाराष्ट्रात सध्या ६ लाख ६८ हजार ३५३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या२, ७६, ५२, ७५ चाचण्यांपैकी ४७ लाख २२ हजार ४०१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर, राज्यात सध्या ३९ लाख ९६ हजार ९४६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, २७ हजार ७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nEqvvg
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!