मराठवाडा

तिसऱ्या लाटेचे नियोजन करा; अजित पवारांच्या सूचना

Share Now

म. टा. वृत्तसेवा,

‘राज्यासह बारामतीत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, ही चिंतेची बाब आहे. प्रशासनाने करोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आत्तापासूनच काटेकोर नियोजन करावे,’ अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदींसह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन बारामतीत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर देणे गरजेचे आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन करावे. सुपे येथे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर उभारण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. सरकारने प्रशासनास कडक निर्बंध लावण्याबाबतचे पूर्ण अधिकार दिले आहेत. निष्कारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी.’

प्रशासनाने आत्तापासूनच करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या नियोजनाबाबात उपाययोजना कराव्यात. करोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील खाटांचे व्यवस्थापन आणि डॉक्टर यांबाबतचे योग्य नियोजन करावे.

– अजित पवार, उपमुख्यमंत्री

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tgcyF0
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!