मराठवाडा

शिवसेनेचे गुंड धमकावतात म्हणणाऱ्या अँकरकडून दिलगीरी; केलं ‘हे’ ट्वीट

Share Now

मुंबईः सीरमचे यांना शिवसेनेचं गुंड धमकावतात, असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं अडचणीत सापडलेले प्रसिद्ध सूत्रसंचालक राहुल कनवाल यांनी अखेर माफी मागितली आहे. त्यांनी आज ट्विटकरुन दिलगिरी व्यक्त केली आहे.

राहुल कनवाल यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकवल्याचं म्हटलं होतं. या नंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई वृत्तवाहिनीला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तसंच, राहुल कनवाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर राहुल कनवाल यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेनेची जाहीर माफी मागितली आहे.

राहुल कनवाल यांनी एक ट्वीट केलं आहे. काल वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मी सीरम इन्स्टिट्यूटला धमकावत असणाऱ्या नेत्याबद्दल बोललो. तो व्हिडिओ शिवसेनेचा नसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा होता. त्यामुळं झालेल्या गोंधळ आणि मनस्तापासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

सुभाष देसाई यांनी काय म्हटलं होतं.

वृत्त वाहिनीवरील एका चर्चेदरम्यान राहुल यांनी शिवसेनेचे गुंड असा उल्लेख केला होता. त्याच्या या वक्तव्यामुळं मोठा वाग रंगला होता. अखेर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पत्र लिहित इंडिया टुडे वृत्तवाहिनीकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले. ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे. शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरु असलेले करोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं होतं.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2PNtvcq
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!