मराठवाडा

double genetic variation in coronavirus: नागपुरात करोनात दुहेरी जनुकीय बदल; विषाणूचे पाच नवे प्रकार

Share Now

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून राज्याची उपराजधानी नागपूर करोनाचा हाॅटस्पाॅट झाले आहे. शहरात दररोज हजारो नवीन रुग्ण वाढत आहेत. वेगाने पसरणाऱ्या या करोनाच्या प्रादुर्भावामागे विषाणूचे दुहेरी म्यूटेशन (दुहेरी जनुकीय बदल) कारण असल्याचे आता नवी दिल्लीतील व्हिआरडिएल प्रयोगशाळेने शिक्कामोर्तब केले आहे. नागपूरात वाढणाऱ्या या विषाणूंत पाच नवे प्रकार आढळल्यानचेही आता समोर येत आहे. त्यामुळे हे नवे ५ प्रकार जुन्या रोग प्रतिकार शक्तीला न जुमानेसे झाले आहेत. ( in in five new strains of the virus found)

विषाणूत होणाऱ्या या बदलाचा अभ्यास करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) आणि ईंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सुक्ष्म जीवशास्त्र विभाग आणि विषाणू प्रयोगशाळेने गेल्या काही दिवसांपासून ७४ नमुने नवि दिल्लीतील व्हिआरडिएल प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल व्हिआरडिएल प्रयोगशाळेने मेयोला पाठवला आहे. त्यापैकी ३५ नमुन्यांमध्ये विषाणूचे म्यूटेशन झाल्याचे आढळले.

क्लिक करा आणि वाचा-
विषाणूच्या रचनेत झालेल्या या बदलापैकी पाच नविन प्रकार आढळले. विषाणूच्या रचनेत झालेल्या या २६ नमुन्यांनमध्ये दुहेरी बदल झाल्याचेही नवी दिल्लीच्या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. या विषाणूच्या रचनेत झालेला हा जनुकीय बदल जुन्या रोगप्रतिकार शक्ती ला जुमानत नाही हे ही प्रयोगशाळेचे मोयोला पाठविलेल्या निरिक्षणात स्पष्ट केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SiP3OR
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!