मराठवाडा

बारामतीत ५ मे पासून ७ दिवस कडक लॉकडाऊन; अजित पवार यांनी निर्देश देताच…

Share Now

बारामती: संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत तसेच रुग्णसंख्या कमी होत नसल्याने शहरासह तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार यांच्या निर्देशानुसार सात दिवस जाहीर करण्यात आला आहे. ५ मे ते ११ मे पर्यंत हा लॉकडाऊन राहणार असून यादरम्यान सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत दूध विक्रीस परवानगी असणार आहे. तर मेडिकल वगळता बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले आहेत.

वाचा:
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी , तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी (४ मे) मध्यरात्रीपासून ते ११ मे मध्यरात्रीपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे.

बारामतीत वाढता करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या होत्या. गेल्या एक महिन्यापासून अंशतः लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. मात्र करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत रविवारी प्रशासकीय आढाव घेतला. त्यानंतर त्यांनी सात दिवसांचे लॉकडाऊन करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये खासगी कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, राजकीय कार्यक्रम, मंगल कार्यालय, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम न करण्याचे तसेच किराणा दुकाने, भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

वाचा:

हॉटस्पॉट परिसरात व्यवहार बंदच राहणार

शहरातील करोनाचे काही हॉटस्पॉट प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत या परिसरातील सर्व व्यवहार, दुकाने बंद राहणार असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.

यांच्यावर होणार पोलिस कारवाई

बारामती शहरासह तालुक्यातील सर्व दुकाने बंद ठेवणार असल्याने लोकांनीही मेडिकल, हॉस्पिटल व्यतिरिक्त रस्त्यावर येऊ नये. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. हॉटेल पार्सल व्यवस्थाही बंद ठेवली जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nJRIwU
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!