मराठवाडा

साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन; काय बंद, काय सुरू राहणार पाहा…

Share Now

: करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर प्रशासन कठोर पावले टाकत असून आता सातारा जिल्ह्यातही उद्या सकाळी सात वाजल्यापासून पुढचे सात दिवस कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी यांनी अंतर्गत याबाबतचा आदेश जारी केला आहे. ( )

वाचा:

सातारा जिल्ह्यात निर्बंध लागू असूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. सकाळच्यावेळी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी आज शासकीय विश्रामगृहात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी आणि पोलीस दलातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या सर्वांची मते विचारात घेतल्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी नंतर याबाबतचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यात उद्या (४ मे) सकाळी सात वाजल्यापासून ते १० मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे.

वाचा:

आदेशात काय म्हटलंय?

– सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील. या दुकानांची घरपोच सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.

– कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीतच चालू राहतील. तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.

– हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खादय पदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यतच सुरू राहतील. तसेच त्यासंबंधित इतर बाबींना १४ एप्रिल रोजीचे आदेश लागू राहतील.

– घरपोच मद्य विक्री बाबत २० एप्रिल रोजीच्या आदेशामध्ये नमूद कालावधीमध्ये दुपारी १२ ते सायंकाळी ५ असा बदल करण्यात येत आहे. या आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहतील.

– या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड विधानाची विविध कलमे तसेच भारतीय साथरोग अधिनियम अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vGN9Wy
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!