मराठवाडा

लसींच्या किंमतींमध्ये तफावत; शिवसेना नेत्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

Share Now

मुंबईः लसीकरणच्या किंमतीवरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण रंगलं आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून लसीची किंमत ठरवण्यात आली आहे. या किंमतींवरुन वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे सचिव यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहलं आहे.

रघुनाथ कुचिक यांनी आरोग्यमंत्री हर्षवर्धन या लिहलेल्या पत्रात करोनावरील लसीच्या किंमतींवर बोट ठेवले आहे. त्यांनी पत्रात म्हटलंय की, भारतातील करोनावरील लसींच्या किंमतींबाबत चिंतीत आहोत. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी इतर देशांसोबतही करार केला आहे. या देशातील लसींच्या किंमतींमध्ये तफावत आहे. याचाच अर्थ फार्मा कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच, सिरम इन्स्टिट्यूट ही संस्था भारतात आहे. त्यामुळं भारतातील नागरिकांना पहिले लस मिळावी ही त्यांची पहिली प्राथमिकता आसावी असं नाही वाटतं का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

रघुनाथ कुचिक यांच्या पत्रानुसार, सीरम इन्स्टिट्युटच्या लसीची एका डोसची किंमत साऊथ अक्रिकामध्ये ३८९ रुपये आहे. अमेरिकेत १६० रुपये, सौदी अरेबियात २८९ रुपये, बांगलादेशमध्ये २९६ रुपये तर, ब्राझिलमध्ये २३३ रुपये तर, ब्रिटनमध्ये २२२ रुपयांना आहे. तसा करार कंपनीनं केला आहे, याकडेही कुचिक यांनी लक्ष वेधलं आहे.

दरम्यान, सीमर इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं कोविशिल्ड लसीचा दर राज्य सरकारला ३०० रुपये असा निर्धारित केला होता. याआधी ही किंमत ४०० इतकी होती. मात्र, सोशल मीडियावरुन झालेल्या टीकेनंतर सीरमनं लसीचे दर कमी केले आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ul0943
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!