मराठवाडा

आधारकार्ड नसलेल्यांचं लसीकरण होणार का?; महापौर म्हणतात…

Share Now

मुंबईः लसीकरण मोहिम मुंबईत राबवली जात आहे. मात्र, मुंबईत परप्रातीयांची संख्या अधिक आहे. अशावेळी त्यांच्याकडे आधारकार्ड नसण्याची शक्यता असते. अशा नगारिकांचे लसीकरण कसं होणार या मोठा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आधार कार्ड नसलेल्या व बेघर नागरिकांचे लसीकरण कसं करणार या प्रश्नावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना म्हटलं की, या गोष्टींमध्ये महापालिकेला लक्ष्य घालावं लागणार आहे. खासदार अरविंद सावंत यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे. मुंबईत अनेक जैन मुनी आहेत. त्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्याचबरोबर बेघर असलेल्यांचंही लसीकरण कसं करणार? अशा घटकांचा विचार होणं आवश्यक आहे. आणि त्याचा विचार महापालिका करत आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

जे काही काळासाठी मुंबईत आले आहेत पण त्यांच्याकडे पुरावा नाही, त्यांची नोंदणी करण्याचा विचार महापालिका करत आहे. परराज्यातील मजूरांची माहिती आहे. त्यातून कार्यवाही केली जाईल. कारण त्यांचं लसीकरण झालं नाही तर करोना वाढण्याची शक्यता आहे, असंही त्या म्हणाल्या.

करोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्याची गरज आहे. ५९ केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण होत आहे. अनेकांना दुसरा डोसही मिळाला आहे, असंही पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच, महापालिका महापालिका लहान मुलांसाठी वार्ड तयार करण्यासाठी जागा शोधत आहे. लहान मुलांसाठी पाळणाघर तयार करण्याचाही प्रयत्न आहे. दिव्यागांसाठी घरात ठेवणं घातक ठरू शकतं. त्यामुळे या सगळ्यांचा विचार केला जात आहे. जागांचा शोध सुरू आहे. त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RoJDBD
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!