मराठवाडा

दिल्लीतून पुण्यात यायचे बनावट चेक; ‘असा’ सापडला म्होरक्या जाळ्यात

Share Now

अहमदनगर: वेगवेगळ्या बँकांमधून बनावट धनादेशाद्वारे कोट्यावधी रुपये काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार विजेन्द्रकुमार उर्फ विजेन्द्र रघुनंदनसिंग दक्ष (दक्षिण दिल्ली) याला नगर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. पुण्यातील त्याच्या सहा साथीदारांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे. (Delhi Man Arrested For Supplying )

बनावट चेक तयार करून त्याआधारे बँकेतून पैसे काढणारी पुण्याची टोळी गेल्या आठवड्यात नगरमध्ये पकडण्यात आली. नगरमधील स्टेट बँकेच्या सावेडी शाखेत अडीच कोटींचा बनावट चेक घेऊन आरोपी तिघे आले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी विपुल नरेश वक्कानी (वय ४०, रा. बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव, पुणे), यशवंत दत्तात्रय देसाई (वय ४९ रा. शाहूनगर, चिंचवड, पुणे) व नरेश रामचंद्र बालकोंडेकर (वय ३३, रा. भोसरी, पुणे) या तिघांना पकडले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून राहुल ज्ञानोबा गुळवे (रा. वाघोली, पुणे) यालाही अटक करण्यात आली. त्याने हे चेक त्याचा दिल्लील साथीदार विजेन्द्र दक्ष (रा. कालकाजी, साऊथ दिल्ली) देत असल्याचे सांगितले. शिवाय गळवे याने आणखी काही चेक संदीप भगत (रा. पुणे) व तुषार आत्माराम कंभारे (रा. वाघोली, पुणे) यांच्या मार्फत विविध बँकेत भरल्याचेही सांगितले. त्यांच्याकडील झडतीमध्ये सहा मोबाईल फोन, वेगवेगळ्या कंपन्या व एजन्सीच्या नावाचे पाच बनावट शिक्के, चेकवर मारतात तो आकाऊंट पे ओनलीचा शिक्का, स्मॉल फायनान्स बँक, आन्ध्र बँक, एचडीएफसी बँक, एस बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, आजरा अर्बन को-ऑप. बँक या बँकाचे कोरे चेकबुक तसेच वेगवेगळ्या नावाने रकमा भरलेले काही चेक आढळून आले. ते ज्या वाहनांतून आले त्या दोन महागड्या मोटारीही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आरोपींनी संगनमत करून अशाच प्रकारे आयसीआयसीआय बँक, शाखा- चिचवड, पुणे येथेही बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे.

वाचा:

त्यानंतर दिल्लीत जाऊन विजेन्द्र दक्ष याला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याला नगरला आणून येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयानने सात मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातील या प्रकारे विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्याकडे याचा तपास सोपविण्यात आला आहे.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ro3rF4
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!