मराठवाडा

अकोल्यात आतापर्यंत ४६ रेमडेसिवीरचा काळाबाजार उघड, १९ जण अटकेत

Share Now

अकोला: अकोल्यात सुरु असलेला इंजेक्शनचा काळाबाजार पोलिसांनी उघड केला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तब्बल १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यत जवळपास ४६ रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार अकोला जिल्ह्यात झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच रुग्णांच्या उपचारात लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन सहज मिळत नसल्याने याचा गैरफायदा अनेक जण घेत आहेत. अकोल्यातही आता अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरु असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. black market of ४६ remedesivir has been opened in akola so far 19 people have been arrested

या काळाबाजार प्रकरणात खाजगी हॉस्पिटल आणि मेडिकलचा समावेश आहे. अकोला शहरातील देशमुख हॉस्पिटल , हॉटेल रेजन्सी, बिहाडे हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, जय श्रीराम मेडिकल, सार्थक मेडिकल, अकोला मेडिकल, वृद्धी मेडिकल, विश्व माऊली मेडिकल यांचा रेमडीसीवीर इंजेक्शनच्या काळाबाजारात समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
पोलिसांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या १९ जणांना ताब्यात घेतल आहे. यातील आरोपी हे बहुतेक खाजगी रुग्णालयातील नर्स स्टाफ आहे. सध्या त्यांच्याकडून ३ रेमडेसिवीर जप्त करण्यात आल्या आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार करीत त्यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांमध्ये विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अकोला हे रेमेडीसीवर काळाबाजाराचं मोठे केंद्र तर नाही ना?, असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण होत आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nNqIfL
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!