मराठवाडा

पुणेकरांसाठी चांगली बातमी; ऑक्सिजनचा पुरवठा नियंत्रणात

Share Now

म. टा. प्रतिनिधी,

पुणे जिल्ह्यात दररोज ३२५ टन ऑक्सिजनची मागणी असून बेल्लारी, जामनगर आणि रायगड येथून सुमारे ११५ टन होऊ लागल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणात आला आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील रूग्णालयांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होऊ लागला असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. ( under control in )

पुणे शहर आणि जिल्ह्यात ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यात रुग्णालये आणि रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी धावपळ करावी लागली होती. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दररोजची मागणी आणि पुरवठा यामधील तफावतही कमी झाली आहे.

याबाबत विभागीय आयुक्त सौरव राव म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यासाठी दररोज ३२५ टन ऑक्सिजनची गरज भासते. मागणीप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला आहे. कर्नाटकातील बेल्लारी येथून दररोज ४० टन, गुजरातमधील जामनगर येथून ४० टन आणि रायगड येथील डोल्व्ही कंपनीकडून ३५ टन ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला आहे. लिंडे कंपनीच्या तळोजा आणि मुरबाड येथील प्रकल्पांतून १२० टन ऑक्सिजन प्राप्त होत आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यातील एअर लिक्विड, आयनॅाक्स या कंपन्यांतून प्रत्येकी ४० टन, तर टायो निप्पॅान या कंपनीकडून ३० टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आता आला आहे.’

क्लिक करा आणि वाचा-

ऑक्सिजनचे होत आहे ऑडिट

रूग्णालयांकडून ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात वापर व्हावा, यासाठी ऑक्सिजन ऑडिट करण्यात येत आहे. त्यामध्ये आढळून येणाऱ्या त्रुटी दुरूस्त करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्सिजनची बचत होऊ लागली आहे, असे विभागीय आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Rmsvwc
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!